प्रतिनिधी । परवेज पटेल
अंबाजोगाईत एक अपघाताची घटना समोर आली आहे. शहरातील ‘स्वाराती’ रुग्णालय ते मोरेवाडी रस्त्यावर एक भरधाव कार थेट पुलाखाली उलटली आहे. कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ही अपघाताची घटना आज दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अपघाताची घटना घडताच आजूबाजूच्या नागरिकांनी सतर्कता दाखवत सदरिल कारमधील दोघांना अधिक उपचारासाठी ‘स्वाराती’ रुग्णालयात दाखल केले आहे. सदरिल कार ही पुण्याची असून अपघातात जखमी झालेले हे अंबाजोगाई येथील रहिवासी आहेत. कारमधील जखमींची नावं संतोष तावरे आणि दयानंद वाघमारे अशी आहेत. दिपावली सणानिमित्त हे दोघेही आपल्या अंबाजोगाई या गावी आले होते. जखमींवर ‘स्वाराती’ रुग्णालयात अधिक उपचार करण्यात येत आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!