लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्षामुळे आवसगावला जाणार्या रस्त्याची दुरवस्था होऊन दोन तीन खेडेगावांतील नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की प्रत्येक गावासाठी रस्ते विकासाची साधने मानली जातात. जर रस्ते चांगल्या प्रकारचे असतील तर वाहतूक वेगवान आणि जलद होते. आणि गावचा विकास होण्यास मदत होते.रस्तेच जर खराब आणि खड्डे युक्त असतील तर अपघाताचे प्रमाण वाढून नागरिकांची गैरसोय होते.केज तालुक्यातील आवसगाव ते सावळेश्वर आवसगाव ते बनसारोळा रस्त्याची गेली दोन ते तीन वर्षापासून रस्त्याचे डांबरीकरणाचे काम झाले नसल्यामुळे खराब रस्त्यामुळे आवसगावला जाणाऱ्या तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या वाहनचालकांचे रस्त्याच्या दुरवस्थेमुळे कित्येकदा छोटे मोठे आपघात होऊन हात पाय मोडून अपंग झाले आहेत तर काहीचे बळी गेले आहेत .

रस्त्याअभावी अनेक समस्या उभ्या राहतात आजारी रुग्णास रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे कदाचित त्या रुग्णाला जीवितास मुकावे लागते. अशा प्रकारच्या घटना राज्यात अनेक ठिकाणी घडल्या आहेत. खराब रस्त्यामुळे निष्पाप आवासगावच्या नागरिकाचा व वाहन चालकांचा बळी गेल्यास लोकप्रतिनिधींना व प्रशासनाला जाग येणार का? आपघात वाढु लागल्याने रस्त्याच्या दुरवस्थेला कंटाळून आवसगावातील नागरिकांना आता रस्ता दुरुस्ती कधी होणार? असा सवाल देखील उपस्थित होत आहे .
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एखाद्या मोठा आपघात झाला तर त्याची जबाबदारी ना प्रशासन घेते,,ना विधानसभा आमदार,ना जिल्हा परिषद सदस्य ,ना पंचायत समिती सदस्य,ना गावचा सरपंच खराब रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष देतात फक्त विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या निवडणूका जवळ आल्या की विविध पक्षांचे कार्यकर्ते राजकारणी, पुढारी नागरिकांच्या घरोघरी जाऊन मतदान मागण्यांपुरतेच लक्ष देतात .
यामुळे शाळा व कॉलेजला जाणाऱ्या मुलांमलीना व नागरिकांना आणि वृध्दांना या रस्त्यावरून प्रवास करताना मरण यातना सहन करून नाहकत्रास सहन करावा लागत आहे .
________________________
सदरील आवसगाव रस्त्याच्या दुरुस्ती चे काम यापुर्वीच मंजूर झाले होते. परंतु अधिकारी व गुत्तेदार यांनी संगनमत करून रस्ता दुरुस्तीचे काम न करताच बजेट उचलले आहे.त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे.विविध पक्षाचे लोकप्रतिनिधीं, कार्यकर्ते राजकारणी,पुढारी, नेते फक्त निवडणूका जवळ आल्याकीच गावा गावात वाड्या वस्त्या वर मतदान मागण्यांपुरतेच फिरकतात.अन्यथा पाच पाच वर्षे फिरकत नाहीत.त्यामुळे नागरिकांनो सावध व्हा आणि मतदान मागण्यांसाठी येणाऱ्या लोकप्रतिनिधीं, कार्यकर्ते राजकारणी पुढारी नेते यांना त्यांची जागा दाखवा.तरी प्रशासनाने आवसगावच्या रस्त्याच्या दुरवस्था कडे लक्ष देऊन लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करून देण्यात यावा. आवसगावची अधोगती कोणाची नजर लागली म्हणून नाही झाली तर गावाकडे कुणाची नजर गेली नाही म्हणून झाली सरपंच हा गावचा प्रमुख नागरिक असतो परंतु आतापर्यंत गावच्या प्रमुखाने तालुका आणि जिल्हा स्तरावर गावचा नाम उल्लेख होईल असे एकही काम केलेले नाही तेव्हा गावातील सुजाण नागरिकांनी याची जाणीव ठेवून येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कार्यक्षम असा सरपंच निवडून द्यावा.
नितीन साखरे . सुशिक्षित नागरिक, आवसगाव.
________________________
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!