वादळवार्ता/बीड
बांधकाम व्यावसायिक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण करणारे केज तालुक्यातील राजाभाऊ आप्पाराव घुले यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण करत एका बिग बजेट सिनेमाची निर्मिती करून मुलगा दिपराज घुले याची प्रमुख भूमिका असलेला अंकुश नावाचा चित्रपट निर्माण करून बीड ते बॉलीवूड असा प्रवास सुरू केला आहे.
केज तालुक्यातील टाकळी सारख्या छोट्याश्या गावातून सुरुवातीला छोटे-मोठे व्यवसाय करून जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर बांधकाम व्यवसायामध्ये एक शासनमान्य गुत्तेदार म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. प्रत्येक काम हाती घेतल्या नंतर ते परिपूर्ण करायचे या स्वभावातून त्यांनी अवघ्या महाराष्ट्रात नाव कमावले आहे. आणि त्या व्यवसाया मध्ये स्थिरस्थावर झाल्यानंतर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या मुलाला चित्रपटसृष्टी मध्ये झळकावण्यासाठी त्यांनी बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली असून दीपराजचा प्रमुख भूमिका असलेला अंकुश नावाचा बिग बजेट चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या ६ ऑक्टोबरला तो सर्वत्र प्रदर्शित होत आहे. त्या अनुषंगाने सदरील चित्रपटाचे प्रमोशन बीड येथे ठेवण्यात आले असून आदित्य डेंटल कॉलेजच्या प्रांगणामध्ये दि. ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता चित्रपटातील सर्व कलाकारांच्या उपस्थितीमध्ये सिनेमाचे भव्य दिव्य असे प्रमोशन ठेवण्यात आले आहे.
या चित्रपटांमध्ये दीपराज राजाभाऊ घुले याची प्रमुख भूमिका असून नायिका म्हणून केतकी माटेगावकर ही प्रमुख भूमिकेत झळकत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपटातील कलाकारांसह बारामती येथील चांडाळ चौकडी ही विनोदी टीमही यावेळी उपस्थित राहणार आहे. जिल्ह्यातीलच नव्हे तर मुंबई आणि पुणे येथूनही मोठ्या प्रमाणावर मान्यवर या प्रमोशन साठी उपस्थित राहणार आहेत. बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून येत बॉलीवूड पर्यंत एन्ट्री मारणाऱ्या भूमिपुत्राच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जिल्ह्यातील सिनेरसिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावण्याचे आवाहन विष्णू घुले यांनी केले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!