आपला बीड जिल्हाक्राईम

रेड्याचे प्रेम म्हशींवर; अन् भांडण मालकांचे !

म्हशीच्या मालकाने रेड्याच्या मालकाचे डोक्यात दगड घातला !

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

केज तालुक्यात एका म्हैस मालकाने रेड्याच्या मालकाच्या डोक्यात दगड घालून त्याचे डोके फोडले आहे. त्याला कारणही तेवढेच मजेशीर आहे.

केज तालुक्यातील आरणगाव येथील म्हैस मालक ऋषिकेष रामलींग भांगे यांच्या मालकीची म्हैस माजावर आल्यामुळे तिचे नंतर तिचे नैसर्गिक रेतनासाठी आरणगाव येथील नारायण दौलत सिरसट यांच्या मालकीच्या रेड्याकडे नेण्यात आले. अशा पद्धतीने वळू द्वारे रेतन केल्यास त्यासाठी म्हैस मालकाने त्याचा मोबदला द्यावा लागतो. मात्र नारायण सिरसट रेतनाचे पैसे मागितले म्हणून ऋषिकेष रामलींग भांगे याने सोमवार दि. १० ऑक्टोबर रोजी ब्रम्हणामाता मंदीराच्या बाजुला रोडवर दुपारी २:३० वा. च्या दरम्यान नारायण दौलत सिरसट याच्या डोक्यात दगड मारून जखमी केले.

या प्रकरणी नारायण दौलत सिरसट याच्या फिर्यादी वरून ऋषिकेष रामलींग भांगे याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ४५९/२०२२ भा. दं. वि ३२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या म्हैस रेड्याच्या अनोख्या प्रेम प्रकरणातून रेड्याच्या रेतनाचे पैसे मागितल्याच्या रागातून म्हैस मालकाने रेड्याच्या मालकाचे डोके फोडले याची चर्चा चवीणे चर्चिली जात आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!