वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज तालुक्यातील बोरगाव येथे एका २४ वर्षाच्या अविवाहित तरुणाने शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
बोरगाव ता. केज येथील दयानंद संतोष आरकडे वय (२४ वर्ष ) या गुरे सांभाळणाऱ्या अविवाहित तरुणाने दि. २९ जानेवारी रोजी दुपारी १२:०० च्या दरम्यान बोरगाव शिवारातील उत्तरेश्वर नवनाथ गालफाडे यांच्या गट नं. ३५ मधील बोरीच्या झाडाला साडीच्या कपड्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
या संदर्भात मयताचे मामा मधुकर सुकाळे यांनी पोलिसांना दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पोलीस नाईक राजू गुंजाळ घटनास्थळी रवाना झाले. प्रेताचा पंचनामा करून प्रेताची उत्तरीय तपासणी उपजिल्हा रुग्णालय केज येथे करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून केज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली जात आहे.