आपले केजभक्ति

नवसाला पावणाऱ्या राजमुद्रा गणपतीच्या दर्शनासाठी भाविक-भक्तांची प्रचंड गर्दी

केज | प्रतिनिधी

केज शहरातील पंचायती समितीच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या नवसाला पावणाऱ्या राजमुद्रा गणपतीच्या ११ व्या वर्षाच्या महोत्सवाला भाविक-भक्तांची प्रचंड गर्दी उसळली आहे. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी केवळ केज तालुक्यातीलच नव्हे, तर जिल्हाभरातून भक्तांचा ओघ सुरू आहे. श्रद्धावान भाविक गणपतीच्या चरणी आपले नवस अर्पण करून सुख, शांती, समृद्धीची प्रार्थना करत आहेत.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने पंचायती समितीचे मैदान रोषणाईने उजळून निघाले आहे. लहान-मोठ्यांसाठी मनोरंजनाचे आकर्षक झोके, रहाटपाळणे, विविध प्रकारचे खाऊ व खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, खेळणी, कपडे, सजावटीच्या वस्तूंची दुकाने यामुळे उत्सवाचे वातावरण अधिकच रंगतदार झाले आहे. महिलांसाठी खास कलात्मक वस्तूंची दुकाने, मुलांसाठी खेळणी आणि खाऊ-पिऊची रेलचेल सुरू आहे.गणेश मंडळाच्या वतीने दैनिक सकाळी व संध्याकाळी आरती, विविध धार्मिक कार्यक्रम, भजन-कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक तसेच बाहेरगावच्या कलाकारांच्या कीर्तन व प्रवचनांनी भक्तांना आध्यात्मिक उभारी मिळत आहे. तरुण मंडळींच्या उत्साहाने मंडळाची आकर्षक सजावट, देखावे आणि दिव्यांची रोषणाई लक्षवेधी ठरत आहे. दररोजच्या आरतीनंतर मंडळाच्या वतीने भाविकांसाठी प्रसादाचे वाटप केले जात असून शिस्तबद्ध दर्शन व्यवस्थेसाठी स्वयंसेवक मंडळ दिवसरात्र कार्यरत आहे. पोलिस प्रशासन, नगरपंचायत आणि आरोग्य विभागाच्या सहकार्याने उत्सवात येणाऱ्या भाविकांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.गणेश भक्तांचा ओघ दिवसेंदिवस वाढत असून आगामी दिवसांत अधिक भाविकांच्या गर्दीची अपेक्षा राजमुद्रा गणेश मंडळाचे सर्वेसर्वा अमर पाटील यांनी व्यक्त केली आहे. केज शहरातील राजमुद्रा गणपती उत्सव सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांसह एक उत्सव सोहळा बनला असून गावागावातील भक्तांची उपस्थिती केज तालुक्यातील एकात्मतेचे दर्शन घडवत आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!