आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

केजमध्ये दोन गटात वाद : शहरात तनावपूर्ण शांतता

अफवांवर विश्वास ठेवू नका- पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर

सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर

वादळवार्ता – गौतम बचुटे

२३ मार्च गुरुवार रोजी रात्री ११:३० वा. च्या दरम्यान केज शहरातील लोंढे गल्ली परिसरामध्ये दोन गटांमध्ये तेढ निर्माण होऊन दोन गट समोरा समोर आल्याने हाणामारी झाली. त्यामध्ये अफवा पसरल्यामुळे दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करून हल्ला केला. घटनास्थळी पोलीस तात्काळ दाखल झाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

या बाबतची माहिती अशी की, दि. २३ मार्च गुरुवार रोजी रात्री ११:३० वा. दरम्यान केज शहरातील लोंढे गल्ली येथे दोन गटात क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले आणि त्या नंतर दगडफेक झाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिवर नियंत्रण मिळविले.

पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार हे स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थिती हाताळत आहेत.

पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग यांच्या फिर्यादीव रून फिर्याद दाखल करून दोन्ही गटातील ७० इसमांना ताब्यात घेतले आहे. तसेच इतर ५० पेक्षा जास्त लोकांवर भादवि १४३, १४७, १४८, १४९, १५३(अ), ३२३, ३२४, २९५, ३३६, ३०८, ४२७, १६०, १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये असल्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवून परिसरात सध्या शांतता आहे.

” पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये असल्यामुळे परिस्थितीवर नियंत्रणात आहे. शहरात सध्या शांतता आहे. सोशल मीडिया, व्हाट्सअप फेसबुक, यावरही पोलीस यंत्रणेचे कटाक्षाने करडी नजर आहे. कोणीही अफवा पसरवू नयेत तसेच कोणत्याही प्रकारे नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये. “

 नंदकुमार ठाकूर

जिल्हा पोलीस अधीक्षक, बीड

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!