वादळवार्ता / बचुटे
मॉर्निंग वॉकला गेलेल्या दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याची घटना केज शहरात घडली आहे.
भाग्यश्री दत्तू वाघमारे ही प्रशांत नगर केज येथे तिच्या आईसोबत राहात आहे. ती जिवन शिक्षण विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. शनिवार दि. २ सप्टेंबर रोजी भाग्यश्री दत्तू वाघमारे ही नित्य नियमा प्रमाणे सकाळी ६:०० वा. च्या सुमारास बीड रोडने मॉर्निंग वॉकला गेली होती. सकाळी ८:०० वाजून गेल्या नंतर ती घरी परत आली नाही म्हणून तिच्या घरच्या नातेवाईकांनी केज शहरात आणि इतरत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. तसेच तिचा मोबाईल बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे दि. २ सप्टेंबर रोजी तिची आई सिंधुबाई वाघमारे हिच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केल्या प्रकरणी गु. र. नं. ५२१/२०२३ भा. दं. वि. ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग हे पुढील तपास करीत आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!