आपला बीड जिल्हा

सोनीजवळा येथील शेतकऱ्यांचे आमरण उपोषण अखेर उप अभियंता यांच्या लेखी अश्वासना नतंर मागे

वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे

केज तालुक्यातील मौजे सोनीजवळा येथील शेतकरी ग्रामस्थ महावितरण केज च्या ढिसाळ कारभाराला वैतागुन महावितरण समोर आमरण उपोषणास बसले होते. महावितरणच्या लेखी अश्वासन दिल्या नंतर अमरण उपोषण तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात आहे .

सविस्तर वृत्त असे कि केज तालुक्यातील सोनीजवळा येथील ग्रामस्थ , शेतकरी पाठीमागील सहा महिन्यापासुन महावितरणाच्या ढिसाळ कारभाराला वैतागले होते . गावातील तथा शेतातील पोलच्या असलेल्या तारा खालती लोबकळत असलेल्या विजेचा तारा तात्काळ दुरुस्त कराव्यात , सोनीजवळा गावातील शेतीसाठी असणारा विजपुरवठा सुरळीत करावा , आदि मागण्या घेऊन सोनीजवळा गावातील शेतकरी , ग्रामस्थ महावितरण कार्यालय केज च्या समोर आमरण उपोषणास बसले असता महावितरणचे उपअभियंता आंबेकर यांच्या लेखी अश्वासनानंतर तात्पुरत्या स्वरूपात आमरण उपोषण मागे घेण्यात आले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!