केज । प्रतिनिधी
दलित नेते नगरसेवक कपिल मस्के हे केज शहर व तालुक्यातील वंचित घटकांचे आवाज बनले आहेत. अगदी वयाच्या १५व्या वर्षापासून त्यांनी फुले, शाहू, आंबेडकर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे आत्मसात करून सामाजिक चळवळीत उडी घेतली.
फुलेनगर भागातून ग्रामपंचायत सदस्य म्हणून प्रवास सुरू करून पुढे नगरपंचायतीत नगरसेवकपदी पोहोचले. या काळात रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता यासारखी मूलभूत कामे तसेच वंचित घटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला .समाजाच्या न्यायासाठी लढताना कपिल मस्केंनी आमरण उपोषणाचा मार्गही स्वीकारला. केज शहरातील भू माफियांनी बळकविलेल्या गायरान जमिनीवर रमाईनगर दलित वस्तीतील २० वर्षांपासूनचे अधिकृमण धारकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी तहसीलसमोर ३ दिवसीय आमरण उपोषण छेडले. या लढ्याला यश मिळवून देत त्यांनी गायरान मुक्तीसाठीचा लढा गाजवला. येवढ्यवरच न थांबता विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना रमाई नगर येथे केली व त्या जागेत विपश्यना केंद्र व अभ्यासिकेसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगीतले ‘आज केवळ शहरातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात कपिल मस्के हे दलितांचे बुलंद नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुण कार्यकर्ते समाजकारणात उतरले असून, मोठी कार्यकर्त्यांची फळी उभारली गेली आहे.
कपिल मस्केंच्या सामाजिक कार्याचा हा झंझावाद आगामी काळात आणखी व्यापक होईल आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी ते अधिक ताकदीने लढतील, असा विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!