वादळवार्ता – आरोग्य
मागील काही दिवसांपासून राज्यात साथीच्या रोगाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. थंडी, ताप, खोकला, अंगदुखी यासारखा आजारासोबत डोळ्याच्या आजारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
अनेकांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याचे दिसत आहे. डोळे आलेलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात पाहिल्यानंतर आपल्याला डोळे येतील, असा अनेकांचा गैरसमज आहे. केज तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी डोळे आलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात पाहिल्यानंतर डोळे येत नाहीत, असे स्पष्ट शब्दात सांगितले. डोळे आलेल्या माणसांकडे बघितले की आपल्याला डोळे येतात असं नाही. त्यांनी ज्या ठिकाणी हात लावला आहे, तिथे आपण हात लावला आणि मग त्याच हाताने जर आपल्या डोळ्यांना स्पर्श केला तर डोळे येऊ शकतात.तसेच डोळे आलेल्या व्यक्तीने वापरलेल्या वस्तू आपण वापरले,त्यांच्या हातात हात मिळवल्याने डोळ्याला इन्फेक्शन होऊ शकते.डोळे आले की डोळे चुरचुरतात, आग होणे, पाणी येणे, प्रकाशाकडे बघता न येणे अशा गोष्टी होतात.डोळे येऊ न देणेसाठी डोळे आलेल्या व्यक्तीच्या फार जवळ संपर्कात न येता ठराविक अंतर राखणे,त्यांना शेक हॅन्ड न करणे,त्याने वापरलेल्या वस्तू जसे रुमाल,टॉवेल,कपडा न वापरणे,सतत आपल्या डोळ्याला हात न लावणे,आपले हात नेहमी साबण आणि पाण्याने स्वच्छ धुणे इ गोष्टी आपण पाळल्या तर आपण यापासून सुरक्षित राहू शकतो.पण याउपर ही डोळे आले तर काळजी करण्याची आवश्यकता नसून 4 -5 दिवसांत बरं वाटायला लागतं. प्रत्येकाला आयड्रॉप वापरण्याची गरज पडेलच असं नाही,परंतु स्वतः औषधी न घेता डॉक्टरांचा सल्ला घेऊनच मग औषधे घ्यावीत, असे केज तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी सांगितले. डोळ्याची स्वच्छता आणि वयक्तिक स्वच्छतेचे नियम दैनंदिन पाळले तरी आपण यापासून दूर राहू शकतो, असेही डॉ.आठवले यांनी सांगितले.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!