आपले केजक्राईम

केज तालुक्यात अनोळखी प्रेत आले आढळून ; घात कि अपघात चर्चेला उधान

केज । गौतम बचुटे 

केज तालुक्यातील जिवाची वाडी शिवारात एक पुरुष जातीचे अनोळखी प्रेत आढळून आले आहे. दि. २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील शिवारात एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत जिवाचीवाडी तलावापासून चिखलबीडकडे जात असलेल्या रस्त्याच्या कडेला असल्याची माहिती सरपंचांनी केज पोलिसांना दिली. माहिती पोलिसांना मिळताच स्वतः पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सोनवणे, पोलिस नाईक चंद्रकांत काळकुटे, वाहनचालक सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शंभुदेव दराडे हे यांनी घटनास्थळी जाऊन सदर प्रेत केज येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उत्तरीय तपासणी व शवविच्छेदनासाठी आणले आहे. यामुळे नागरिकांत उलटसुलट चर्चेला उधाण आले असून हा घात की अपघात असावा ! हे प्रेताची ओळख पटल्यानंतरच सर्व उलगडा होईल. दरम्यान पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या अनोळखी प्रेत प्रेताची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

तसेच या बाबत कुणाला काही माहिती असेल ते त्यांनी केज पोलीस किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी केले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!