आपला बीड जिल्हा

ॲड. माधव जाधव यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करा- खा. बजरंग सोनवणे

केज । प्रतिनिधी

बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी परळीत झालेल्या निवडणुकीदरण्यात प्रकरणात लक्ष वेधत आपली प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटले आहे कि,परळीत बोगस मतदान रोखण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते ॲड. माधव जाधव यांच्यावर २० नोव्हेंबर रोजी परळी येथे जीवघेणा हल्ला करण्यात आला. याच परिसरात उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या सुरक्षा रक्षकांनाही हल्लेखोरांकडून दमदाटी करण्यात आली.

हा प्रकार पोलीस यंत्रणेसमोर घडूनही अद्यापपर्यंत हल्लेखोरांवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. उलट, आकसापोटी उमेदवारांच्या नातेवाईकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. हा पक्षपातीपणा खपवून घेतला जाणार नाही.

बीड पोलीस अधीक्षक साहेबांना माझे आवाहन आहे की, ॲड. माधव जाधव यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी. अन्यथा, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, व त्याच्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी पोलीस अधीक्षकांवर असेल. अशी प्रतिक्रिया बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!