वादळवार्ता – केज
नादेंड जिल्ह्यातील बोंडार हवेली गावातील बौद्ध तरुण अक्षय भालेराव याची अतिशय निघृणपणे हत्या करण्यात आली. गावात भीमजयंती साजरी केल्याने गावातीलच कांही तरुणांनी अक्षयची हत्या केल्याचा अक्षयच्या कुटुंबियांचा आरोप आहे. 
दरम्यान,पोलिसांनी आरोपींविरोधात ॲट्रोसिटी ॲक्टअंतर्गत गुन्हे दाखल केले असून ७ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत तर दोन आरोपींचा शोध सुरु आहे. सदर हत्येनंतर नांदेडमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. दुसरीकडे अक्षयच्या हत्येनंतर समाज माध्यमांवर तीव्र भावना संपुर्ण महाराष्ट्रात होत असताना.
त्याच अनुषंगाने केज येथील दलित आन्याय आत्याचार निर्मुलन समीतीच्या वतीने ” अक्षय भालेरावच्या मारेकर्यांना फाशी द्यावी ” यासाठी केज तहसिल समोर तीव्र निदर्शनाचे आयोजन दि.०६ जुन रोजी सकाळी ११ वाजता केले आहे. सदरील निदर्शनास केज तालुक्यातील भिम सैनिकांनी जास्तीच्या संख्येने उपास्थित रहावे असे आवाहन समीतीचे अशोक गायकवाड , लखन हजारे , सुमित शिंदे , सतीश बनसोडे , प्रितम साळवे , निलेश ढोबळे आदि पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!