” खळखळाट “
दहा वर्षाचा संघर्ष रस्त्याचा येईल का हो घडुन ?
सहा महिन्यापासुन पत्र दाबले, हर हर म्हणत पडद्या अडुन !
भोळी भाभड्या जनतेचे रस्त्यावर चालत असता गेले मणके मोडुन”
सांगा ना हो उमरी रस्त्याचा येईल का विकास घडुन !
वादळवार्ता वार्तांकन – मुबशिर खतीब
केज शहर अंतर्गत उमरी रस्ता मजबुतीकरण व काँक्रेटिकरण करण्याची मागणी केज विकास संघर्ष समिती गेली 20 वर्षांपासून करत आहे. सध्या या कामाची जबाबदारी केज नगरपंच्यायतने घेतली असून या कामासाठी 10 लक्ष मजबुतीकरण व 88 लक्ष काँक्रेटिकरण साठी निधीही मंजूर झाला आहे.
उमरी रस्त्याचे मंजूर काम तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी केज विकास संघर्ष समितीने केज नगर पंचायत कडे मागणी करून 01 नोव्हेंबर रोजी 11 वाजेपासून बेमुदत घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
31 ऑक्टोबर 2022 रोजी केजच्या प्रशासनाशी चर्चा होऊन या कामाची निविदा (टेंडर) प्रक्रिया पार पाडण्यासाठी व प्रत्यक्ष काम सुरुवात करण्यासाठी कांही वेळ मागितला असून यासाठी समितीने 30 नोव्हेंबर 2022 ही अंतिम मुदत दिली असून तो पर्यंत आंदोलन स्थगित ठेवण्याचे ठरवले आहे. जर तात्काळ प्रशासनाने कार्यालयीन प्रक्रिया सुरु केल्या नाहीत तर 1 डिसेंबर 2022 नंतर समिती आपले स्थगित केलेले आंदोलन पुन्हा बेमुदत सुरू करण्याचा इशारा देत आहे.
तरी केज नगरपंच्यायतने उमरी रस्त्याच्या कामाची प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी असे समितीने म्हटले आहे.