गेवराई/प्रतिनिधी
गेवराई तालुक्याचे भूमिपुत्र, पाचेगाव पंचक्रोशीतून अत्यंत गरीब कुटुंबातून ,आई-वडिलांची परिस्थिती बेताची अशा परिस्थितीतही जिद्द ,चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश खेचून आणणारा बंजारा समाजाचा जयराम तांड्याचा हिरा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये पोलीस उपनिरीक्षक (PSI) या पदासाठी निवड झाली असून ,चिरंजीव राहुल शेषेराव राठोड यांचे समस्त बंजारा समाज बीड जिल्हा यांच्यावतीने कौतिक व अभिनंदन…करण्यात आले. तसेच आपल्या पोटाला चिमटा घेऊन आपल्या पाल्याला शिक्षणासाठी प्रेरित करणारे सर्वगुणसंपन्न आदर्श मातापिता श्री शेषराव राठोड व त्यांच्या पत्नी यांचे सुद्धा कौतुक खूप करण्यात येत आहे . प्रशासनाच्या सेवेमध्ये आपण आपला अनमोल हिरा समाजाच्या सेवेसाठी दिल्याबद्दल बंजारा समाजाला आपला सार्थ अभिमान आहे….. सध्याच्या तरुण पिढीला आदर्श वाटावा असा यश संपादन चिरंजीव राहुल यांनी केले आहे…. युवा पिढीने व्यसनाची नशा न करता शिक्षणाची नशा केल्यास निश्चितच यश मिळते हे राहुलने दाखवून दिले आहे…..युवा पिढीने आई-वडिलांच्या परिस्थितीचा विचार करून चिरंजीव राहुल दादा सारखे अभ्यास करून प्रशासकीय सेवेमध्ये मोठे यश मिळू शकते हे आज सिद्ध झाले आहे….सध्याच्या काळामध्ये शिक्षणच हे असे साधन आहे की, आपण आपल्या पिढीचे व उद्याच्या पिढीचा विकास करू शकतो….त्यासाठी प्रत्येकाने शिक्षणाची कास धरली पाहिजे.. ग्रामीण भागातील परिस्थिती पाहता आपल्या पाल्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देऊन, त्याबरोबर संस्कार पण चांगले देणे गरजेचे आहे …..यासाठी गावातील सर्व सुजान नागरिकांनी लक्ष देऊन ज्या ठिकाणी ज्ञान मिळते अशा शाळेचे वेगवेगळे साहित्य, पुस्तके देऊन विद्यार्थी व नागरिकांच्या ज्ञानात भर पडेल त्यातून सामाजिक ,शैक्षणिक, आर्थिक, राजकीय विकास कसा होईल…. याकडे लक्ष द्यावे . आयुष्यातील सगळ्यात मोठा आनंद आज राहुलच्या आई-वडिलांना झाला असेल कारण श्री शेषराव राठोड हा गरिबीतला माणूस आपुलकी, जिव्हाळा आणि प्रेमाने वागणारा नियतीने आज त्याला PSI चा बाप होण्याची संधी दिली… अशी संधी समाजाच्या प्रत्येक बापाच्या वाट्याला वेगवेगळ्या पदाच्या माध्यमातून येवो.. अशी अपेक्षा त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दिली आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!