वादळवार्ता वार्तांकन – केज
केज येथे इंग्रजी माध्यमाची नामांकित शाळा पवनराजे इंग्लिश स्कूल हि केज ग्रामीण तथा शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन शिक्षणाच्या विकासाची एक संस्था म्हणुन नावरुपास आली आहे. दि 8 जानेवारी रोजी संस्थेमध्ये पालक मेळाव्याचे आयोजन सकाळी 8 ते दुपारी 03 वाजेपर्यंत संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. सदर मेळाव्यास पालक तथा विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात हजेरी लावत मेळाव्यास उंदड प्रतिसाद दिला. सदरील मेळाव्यास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष खंडेराव चौरे हे उपस्थित होते. मेळाव्या दरम्यान प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणावर चर्चा करण्यात आली.
सदरील मेळावा यशस्वी करण्याकरिता पवनराजे इंग्लिश स्कुल केजचे प्रिसिंपल अशोक मस्के तथा कै. राम चौरे प्राथ. माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रिसिंपल घुले सर , चौरे मॅडम , अजय भांगे सर , मुंडे सर , घाडगे मॅडम , सहास काळे सर, विनोद गुंड सर , अमोल खाडे सर , एस. एन. चौरे सर, डी. एस. चौरे सर , शिनगारे सर , विशाल सिरसट सर, वायबसे सर , महेश राऊत सर , प्रविण तांदळे सर , स्नेहा मॅडम , निकिता मॅडम , सपना मॅडम, बचुटे मॅडम , पुनम केदार मॅडम , कविता मुळे मॅडम , स्वाती कसबे मॅडम , सुजाता सपाटे मॅडम , अर्जना कदम मॅडम आदि शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.