आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

केज पोलिसांच्या गुन्हेगार शोध (डी बी) पथकाचीची मोठी कारवाई ; मोटार सायकल चोर मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात

वादळवार्ताकेज

केज पोलिसांच्या गुन्हेगार शोध शाखेच्या (डी बी) पथकाने मोठे कारवाई केली असून एका मोटरसायकल चोराला चोरीच्या मोटार सायलीसह ताब्यात घेत त्याच्या कडून एक मोटरसायकल हस्तगत केली आहे. त्याच्याकडून परिसरात चोरी गेलेल्या अन्य मोटरसायकलच्या चोरीचा तपास लागण्याची शक्यता आहे.

या बाबतची सुत्रांकडू समजलेली माहिती अशी की, केज शहरातून मागील वर्षी मंगळवार पेठ कॉर्नर केज येथून चोरी गेलेली मोटार सायकल चोरीतील आरोपी हा अंबाजोगाई बस स्थानक परिसर असल्याची माहिती मिळाल्या केज पोलिसांच्या गुन्हेगार शोध (डी बी) पथकाला मिळाली माहिती मिळताच या पथकाने ही माहिती वरिष्ठ अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि अप्पर पोलीस अधीक्षक सौ. कविता नेरकर-पवार मॅडम, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार आणि प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंडगे मॅडम यांना कळवून त्यांच्या आदेशाने पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम यादव, पोलीस नाईक दिलीप गित्ते आणि पोलीस नाईक महादेव बहिरवाळ हे खाजगी वाहनाने अंबाजोगाईकडे रवाना झाले.

पोलीस पथक अंबाजोगाईला जाताच तेथील स्थानिक पोलीस कर्मचारी घोळवे, हनुमंत चादर यांचे मदतीने संशयित आरोपी राहुल शरद शिंदे वय (२१ वर्ष) रा. क्रांती चौक धारूर यास मोटार सायकल क्र. (एम एच ४४/आर ३००९) सह ताब्यात घेतले. संशयित आरोपीला सोबत घेऊन त्याला केज पोलीस ठाण्यात आणले. आवश्यक त्या बाबींची पूर्तता करून त्याला गुन्ह्यात अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक राजू गुंजाळ हे करीत आहेत.

राहुल शिंदे हा जी मोटार सायकल हँडल लॉक केलेली नाही ती डायरेक्ट करून चोरून नेत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

केज पोलिसांच्या डी बी पथकाने ताब्यात घेतलेल्या राहुल शिंदे याच्या कडून आणखी चोरीला गेलेल्या मोटार सायकली आणि त्याने त्यांची लावलेली विल्हेवाट याची माहिती मिळून गुन्हे उघड होऊ शकतात.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!