आपला बीड जिल्हा

पवनराजे इंग्लिश स्कुल केज मध्ये लोकमान्य टिळकांची जयंती साजरी

वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब

पवनराजे इंग्लिश स्कुल कै.राम चौरे प्रा.मा. विद्यालय केज येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे कि आज केज तालुक्यातील नामांकित शाळा पवनराजे इंग्लिश स्कुल केज व कै. राम चौरे प्राथमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय केज येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली .

कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पुजन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शाळेचे मुख्याध्यापक मस्के सर तथा प्रमुख मार्गदर्शक वायबसे सर यांच्या हस्ते करण्यात आले .

कार्यक्रमाचे अध्यक्ष , प्रमुख मार्गदर्शकाचा सत्कार करण्यात आला .

तसेच इयत्ता चौथी ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी मैथली चौरे, ज्योती चवरे, सागर चौरे, रेणुका खाडे , श्रेया ढाकणे , अभिवर्य देशमुख , धिरज पंडित, अनिकेत जाधव ,शुभंभ ढोबळे , सुहास ढोबळे, सार्थक ढोबळे, समर्थ चौरे, अक्षरा जोगदंड , अजिक्य चौरे , कृष्णा थोरबोले, साक्षी चौरे , विदीशा गायकवाड आदि विद्यार्थ्यांनी मनोगत व्याक्त केली .

तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वायबसे सर यानी मौलीक मार्गदर्शन केले तर अध्यक्षीय भाषणामध्ये महापुरुषाचे विचार अवलबीने काळाची गरज आहे असे मस्के सर यांनी सांगीतले .

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दहावीची विद्यार्थिनी किरण केदार हिने केले तर आभार पंकज घुले सरांनी मानले या कार्यक्रमाचे अयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख घाडगे मॅडम व कदम मॅडम यांनी केले होते या कार्यक्रमास विद्यार्थी शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!