आपला बीड जिल्हा

दिपावली निमित्ताने सहाय्यक पोलिस निरिक्षक शंकर वाघमोडे यांचे जनतेला आवाहन……

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

चोरांपासून सावध राहण्याचे सपोनि शंकर वाघमोडे यांचे नागरिकांना आवाहन

आनंदाचा दिवाळी सण साजरा करताना केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सणासुदीच्या काळात आपल्या छोट्याश्या चुकीमुळे आणि निष्काळजीपणामुळे चोरी, घरफोडी सारख्या घटना घडू नयेत. म्हणून नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.

आपला निष्काळजीपणा आणि चुकीमुळे चोरी, घरफोडी अशा घटना दुर्दैवाने घडल्यास; चोरांच्या घरी दिवाळी अन् आपल्या घरी शिमगा साजरा करण्याची दुर्दैवी वेळ येऊ नये म्हणून केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी दिवाळीच्या शुभेच्छा बरोबरच खबरदारीचे आवाहन केले आहे.

दिवाळीसना निमित्त बाजारात गर्दी होत आहे. त्याचा फायदा घेऊन गुन्हेगार वचोर गैरफायदा घेण्याची शक्यता असते. म्हणून अनोळखी व संशयास्पद ईसमास घरात प्रवेश देऊ नये. सोने, चांदीचे दागिने उजळवून देण्याच्या आणि दागिन्यांना पॉलिश करून देणारे हात चलाखी करून फसवणूक करण्याची शक्यता असते. सुट्टीवर किंवा बाहेरगावी जाताना घरात किमती वस्तू ठेऊ नयेत. बाहेर जाताना दर्शनीय दरवाजाला कुलूप न लावता पर्यायी दरवाजा असेल तर तो पर्याय निवडावा. तसेच घरातील एक लाईट चालू ठेवावा. घरा समोर चप्पल बूट आणि वाळू घातलेले काही कपडे ठेवावे. तसेच दिवाळीच्या सणात शोभेची दारू व अतिशबाजी करताना काही अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी. लहान मुले अतिशबाजी करत असेल तर आपण तेथे हजर राहावे. त्यामुळे काही अनुचित प्रकार आणि अपघात घडणार नाहीत. बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना कल्पना जावे. जर काही अनुचित प्रकार घडलयास तात्काळ ११२ क्रमांकावर कॉल करून पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षकशंकर वाघमोडे यांनी केले आहे.

Happy Diwali..

आनंदी आणि सुरक्षित दिवाळी..

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!