आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

महावितरण कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल

वादळ©वार्ता – केज

शासकीय कार्यालयात शासकीय परिपत्रकान्वये , कायद्यान्वये काम केली जातात तथा सर्वसामान्य माणसांची नियमानुसार कामे केली जातात परंतु कांही माणसं अनाधिकृतपणे कामे करुण द्यावेत असा हट्ट करतात आणी कायद्याच्या कचाट्यात सापडतात.

या बाबत सविस्तर वृत असे कि, केज तालुक्यातील टाकळी येथील शेतकरी धनराज सदाशिव घुले दि. 17/01/2023 रोजी 12.30 वा. केज येथील महावितरण कार्यालय केज येथे जाऊन त्या ठिकाणी उपकार्यकारी अभीयंता नामदेव सुतार, आनंद सीरसाट, सेक्युरीटी फुलचंद डापकर कंत्राटदार आक्रम सय्यद हे उपस्थित असताना त्यांचें समोर जाऊन , माझे शेतात ए.बी. केबल नको मला तार ओढुन द्या आणी जर तुम्ही माझे काम केले नाही तर बघतो असे म्हणत बाहेर जाऊन त्याने स्वताचे अंगावर पेट्रोल ओतून पेटवुन घेण्याचा धाक दाखवीला म्हणुन श्रीनाथ सुनील शहाणे कनिष्ठ अभियंता ( महावितरण केज ) यांच्या फिर्यादीवरून धनराज सदाशिव घुले याच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १८९ नुसार केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पुढील तापस सपोनि. शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पोना. निरडे हे करत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!