नराधमाला तीन दिवसांची पोलीस कोठडी
वादळवार्ता – गौतम बचुटे
गुढी पाडव्याच्या सणाच्या दिवशीच एका नराधम सालगड्याने मालकाच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना केज तालुक्यात घडली आहे.
केज तालुक्यात एका गावात अत्यंत संताजनक घटना घडली आहे. शेतात मजुरी काम करणाऱ्या सालगड्याने घरी कोणी नसल्याची संधी साधून मालकाच्या सतरा वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीला बळजबरीने शेतातील घराच्या पाठीमागे असलेल्या निर्मनुष्य स्थळी शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
पीडित अल्पवयीन मुलीने प्रकार तिच्या आईला सांगितला मुलीच्या पालकांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात नराधम आरोपीच्या विरुद्ध गु. र. नं. १७२/२०२३ भा. दं. वि. ३७६ (आय), बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा २०१२ चे कलम ४ (२), १० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच तपासी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक सिमाली कोळी यांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
आरोपीला जिल्हा सत्र न्यायालय अंबाजोगाई येथे हजर केले असता न्यायालयाने त्याला दि. २५ मार्च पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी कोठडी सुनावली आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!