आपला बीड जिल्हाआपले केजविशेष

नौकरीच्या मागे न लागता MA.Bed शेतकरी होणार लखपती – शेतकर्‍याच्या मेहनतीची किमया

वादळवार्ता – केज

शेती करताना कमी वेळेत व कमी खर्चात जास्त उत्पादन कसे मिळेल यासाठी कांही शेतकरी विविध पिके घेण्याचा प्रयोग करतात. कमी गुंतवणूक करून शेतीतून भरघोस उत्पादन घेतली जातील व त्यामाध्यमातून आपली आर्थिक सुधारणा कशी होईल यासाठी प्रयत्न करतात. फक्त डोक्यात असावी लागते ती फक्त कल्पना आणी तीच कल्पना सत्यात उतरविण्याचा प्रयत्न केज येथील उच्च शिक्षीत शेतकर्‍यांनी केला आहे.

 

या बाबत सविस्तर वृत्त असे की केज शहरांमध्ये केजडी नदीच्या पूर्वेकडील दिशेस सर्वे न. ३३५ मध्ये वास्तव्यास असणारे शेतकरी धनराज बबन जाधवर शिक्षण एम.ए.बी.एड यांनी उन्हाळी बाजरीचा प्रयोग आपल्या ५ एकर असणाऱ्या शेतीमध्ये केला . त्यांनी बाजरी पिक घेत असताना निर्मल शिड्स चा वापर करुण त्याचे तंतोतंत नियोजन केले. मशागती पासुन ते लागवडी पर्यंत प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष दिले. उन्हाळी पिक असल्यामुळे कमी पाण्यातही उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे बघता बघता त्यांच्या ५ एकरामध्ये बाजरीचे पिक डवलु लागले ते पिक नजरेत सुद्धा सामावत नव्हते. त्या बरोबरच वन्यजिवापासुन पिकांना सरंक्षण देण्यासाठी एक मोठा विविध आवाजाचा स्पीकर घेऊन ते पिकांच्या चारही दिशाने फिरतात .त्यांना हे पिक घेण्यासाठी एकुण १९००० हजार रुपये खर्च आला या पिकांच्या माध्यमातून त्यांना सरसरी ५ लाख रुपये उत्पन्न होईल असा अंदाज आहे.

उच्चविद्या विभूषित असतानाही नोकरीच्या मागे न लागता शेतकरी धनराज बबन जाधवर यांनी उत्कृष्ट शेती करून एक आदर्श निर्माण केला आहे . या त्यांच्या कार्याचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!