आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

पिकअप चोरी करणारा चोरटा दोन पिकअपसह लातुर जिल्हयातुन केज पोलीसांनी घेतला ताब्यात.

दै.वादळवार्ता /केज

पोलीस स्टेशन केज येथे गुरनं.३८७/२०२४ कलम ३०३ (३) बीएनएस व गुरनं.३९४/२०२४ कलम ३७९ प्रमाणे पिकअप चोरीचे अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हे दाखल होते.

पोलीस स्टेशन केज व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय केज येथील कर्मचारी हे नमुद गुन्हयात चोरी गेलेले दोन पिक अप चा शोध घेत असतांना त्यांना यांनी गुप्त बातमीदारां मार्फत माहिती मिळाली की सदर गुन्हयातील चोरी गेलेले पिकअप हे लातुर जिल्हयात असल्याची माहिती मिळाल्यावरुन मा. सहा. पोलीस अधीक्षक कमलेश मीना व पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन पोलीस स्टेशन केज़ यांचे मार्गदर्शनाखाली पथक तयार करुन आरोपीचे शोध कामी रवाना केले होते. सदर पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सदर गुन्हयातील आरोपीतास लातुर जिल्हयातील रेणापुर येथुन सदर गुन्हयातील आरोपी नामे मुसेफ अब्दुल रहिम कुरेशी, वय १९ वर्षे, रा. सराई गल्ली बसवेश्वर चौक, रेणापुर ता, रेणापुर जि. लातुर यास ताब्यात घेवुन सदर आरोपीताकडुन सदर गुन्हयात चोरीस गेलेले १) टाटा आयसी कंपनीचे ४,५०,०००/-रुपये किंमतीचे व २) महेंद्रा कंपनीचे २,०००००/- रुपये किंमतीचे पिकअप जप्त केले आहे. असा ऐकणु ६,५०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.गुन्हयात अटक करण्यात आलेल्या आरोपीतास मा. न्यायालयाने दिनांक २०/०७/२०२४ पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.

सदरची कार्यवाही ही मा.श्री. नंदकुमार ठाकुर, पोलीस अधीक्षक, बीड, मा. श्रीमती. चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहा. पोलीस अधीक्षक कमलेश मीना व पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन पोलीस स्टेशन केज यांचे आदेशान्वये पोउपनि राजेश पाटील, पोना/दिलीप गित्ते, पोह/उमेश आघाव, पोह/बाळासाहेब अहंकारे, पोअं/ रशिद शेख, पोअं/संतोष गित्ते यांचे पथकाने केली आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!