सामाजिक कार्यकर्ते अमर पाटील यांच्या कल्पनेतून सुरू असलेल्या गणेश मंडळाचे ९ वे वर्ष
बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणेच्या हस्ते देखाव्याचे उद्घाटन
प्रतिनिधी । केज
केज तालुक्यामध्ये देखाव्यासाठी तथा सामाजिक उपक्रमासाठी प्रसिद्ध असणारे गणेश मंडळ म्हणून राजमुद्रा गणेश मंडळ पाठीमागील नऊ वर्षापासून कार्य करत आहे. त्यातच या वर्षी अद्भूत हिमालय पर्वतातील केदारनाथ मंदिराची प्रतीकृती देखावा साकारला आहे .
केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक तसेच पंचकेदार व छोटा धाम ह्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली तर आद्य शंकराचार्यांनी ह्या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानण्यात येते. केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर स्थित असून येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे. गौरीकुंडहून १४ किलोमीटर (८.७ मैल) लांबीचा खडतर प्रवास करूनच केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते. मात्र राजमुद्रा गणेश मंडळ केज यांच्या माध्यमातून पंचायत समिती केजच्या मैदानात उभारलेल्या केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार आहे. या देखव्याचे उद्घाटन बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे हे आज सायं ७ वाजता करणार असुन आजपासुन हे मंदर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.या अद्भूत देखावा उभा केल्यामुळे राजमुद्रा गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अमर पाटील यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!