बीड/प्रतिनिधी
दि.25/09/2024 रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, पाटोदा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कल्याण नावाचा मटका जुगार आणी ऑनलाईन बिंगो चक्री जुगार काही इसम स्वतःच्या फायद्यासाठी खेळत आणी खेळवीत आहे.
अशी खात्रीलायक बातमी मिळाल्या वरून त्यांच्या पथकातील कर्मचारी यांना सदर ठिकाणी छापा मारण्याचे आदेश दिलाने त्यांच्या पथकातील कर्तव्यदक्ष अधिकारी दिलीप गित्ते, शमीम पाशा , प्रकाश मुंडे, शहदेव म्हेट्रे यांनी सदर ठिकाणी छापा मारून एकूण 43,090/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ऑनलाइन चक्री चालवणारा मालक भरत जाधव, चक्री चालत असलेला गाळा मालक बप्पा बावणे, चक्री चालवण्यासाठी आयडी पुरवणारा आयडी मालक चव्हाण,रा. धाराशिव तसेच तीन मटका घेणारे एजंट व त्यांचा मटका बुकी मालक भरत नागरगोजे रा. पाटोदा अशा एकूण सात आरोपीवर पाटोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदरची कार्यवाही ही मा.पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ ,अपर पोलीस अधीक्षक बीड सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या आदेशाने वर नमूद पथकाने केलेली आहे .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!