वादळवार्ता – केज
आज दि.३० रोजी सकाळी नेहमीच्या सवयीप्रमाणे कळंब तालुक्यातील भोगजी गावातील शेतकरी पंढरीनाथ कोडीबां आडसुळ वय ४५ वर्ष हे आपल्या शेतातील जनावरांना भुस्कट टाकीत असतानां आचानक त्यांच्या हाताला क्रोबा जातीच्या सापाने दंश केला त्यांनी न घाबरता आरडा ओरडा करून आसपासचे माणसे जमविले व प्रथम त्या सापला मारले व तो साप सोबत घेऊन तात्काळ उपचारासाठी कळंब या ठिकाणी डिकले हॉस्पीटल येथे ७ वाजाता दाखल केले व तेथील डॉ डिकले यांना प्रथम उपचार करून अंबाजोगाई येथे रेफर केले पंरतू आडसुळ यांचे चुलत भाऊ बालाजी आडसुळ यांनी माळेगांव ते लोखंडी रस्ता खराब असल्यामुळे केज मार्गे ते अंबाजोगाई कडे निघाले पण केज मधुन जात असताना त्यांचे सलाईन संपले व त्यांनी थेट सकाळी ८ वाजता केज उपजिल्हा रुग्णालय गाठले त्या वेळेस तेथे हजर असलेले डॉक्टर सुरज कोठावळे , अयेशा शेख , या डॉक्टरांनी वेळ न घालविता आपल्या अनुभवाच्या बळावर त्या दृष्टीने उपचाराला सुरूवात केली. प्रथम रूग्णाला कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात आला दोन तास त्याच्यावर शर्थीचे उपचार केले व पंढरीनाथ आडसुळ यांना जीवदान देण्यात यश आले व डॉक्टरांनी सुटकेचा निःश्वास सोडला यावेळी डॉ संजय राऊत , सुरज कोठावळे , अयेशा शेख, सिस्टर गजभार कावेरी , ठोंबरे शोभा यांनी अथक परिश्रम घेतले त्या बदल आडसुळ परिवाराने सर्व डॉक्टरांचे आभार मानले व आज केज उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आमच्या साठी देवदूतच ठरले अशी भावाना बालाजी आडसूळ यांनी व्यक्त केली.
केज उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ संजय राऊत यांनी प्रतिनिधीशी बोलतानां सांगितले केज उपजिल्हा रुग्णालयात कुठल्याही जातीचा साप , नाग, धामण परड , क्रोबा विवीध प्रकराचे विषारी सापवर पुर्ण उपचार सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे अंबाजोगाईला जाण्याची गरज नाही.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!