वादळवार्ता प्रतिनिधी – शाहेद खतीब
केज नगरपंचायतच्या ढिसाळ कारभारामुळे केज नगरपंचायत या ना त्या कारणाने सतत चर्चेत असते . केज शहरामध्ये जवळपास तीस हजार लोकसंख्या आहे . केज शहरामध्ये आठरापगड जातीचे लोक वास्तव्य करतात . या आठरापगड जातीच्या लोकांसाठी केज येथे क्रांतीनगरच्या कांही अंतरावरती सार्वजनिक स्मशानभुमी आहे .
मात्र सार्वजनिक स्माशानभुमी मध्ये रात्री अपरात्री जर अंतिम संस्कार करण्याची वेळ आली तर या सार्वजनिक स्माशानभुमी मध्ये सपुर्णता: अंधार असल्याकारणामुळे व एकच पथदिवा गेटवरती बसवीला असल्याकारणाने त्या दिव्याचा प्रकाश अपुरा पडतो त्यामुळे अंतिम संस्कार करण्यास आलेल्या कुटुबांना, नागरीकांना जळत्या सरणाच्या प्रकाशावरतीच अंतिम संस्कार करावे लागतात .
मात्र याकडे नमपंचायत प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष होत असताना दिसुन येत आहे , विकासाच्या गप्पा मारणारे नेते चुप आहेत जर याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर या ठिकाणी जीवतहानी होण्यास नाकारता येणार नाही.
चौकट – वारंवार निवेदन तक्रारी देऊन फक्त एकच दिवा चबुतर्यावरती लावला गेला आहे याला सुरु करण्या करीता बटन नसुन दिव्यास लागडाच्या साहाय्याने हालवुन चालु करावा लागत आहे .
(स्मशानभूमीतील कामगार )