वादळवार्ता – केज
केज दि.२९ ( प्रतिनिधी ) तालुक्यातील नांदूरघाट येथे बीड व कळंब येथून आलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या दोन एस.टी. बस मधील १७० डिझेलची चोरी अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची घटना शनिवार पहाटे घडली असून बीड आगाराच्या बस चालकाच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात डिझेल चोरीचा गुन्हा दाखल झाला असुन या अज्ञात डिझेल चोरांचा तपास सहाय्यक फौजदार जसवंत शेप हे करीत आहेत.
बीड आगाराचे बस वाहक बाळासाहेब चंद्रभान नागरगोजे व चालक युवराज भागुराम कोळपकर हे बस क्र.एम.एच.२० बी एल. २२०५ ही आपली बस घेवून नांदूरघाट येथे
शुक्रवार दि.२८ जुलैच्या संध्याकाळी साडे सहा वाजता मुक्कामी पोहचले असता बसमधील प्रवाशी नांदुर येथे सोडुन बस चौसाळा रोडवर आसलेला एच.पी.या येडेश्वरी पेट्रोलपंपावर उभी केली होती.याच ठिकाणी उस्मानाबाद जिल्ह्य़ातील कळंब आगाराची बस क्र.एम.एच.२० बी.एल.१७४४ ही पण बस मुक्कामी आली त्या बस चालक भिमाशंकर साहेबराव काळे चालक व वाहक मनोज विलास काटे वाहक यांनी माझ्या बसच्या पाठीमागे बस मुक्कामी उभा केली तसेच आमच्या विरुद्ध बाजुला धारूर आगाराची व पाटोदा आगाराची अशा दोन बसेस उभा होत्या आम्ही रात्रीचे जेवन वैगेरे करून बस मध्ये झोपलोत मध्यरात्री दिड ते दोन वा सुमारास गाडीचा खडबड आवाज आल्याने मी व वाहक खाली उतरलोत आम्हाला पाहून एक अनोळखी इसम पाठीमागे उभ्या असलेल्या काळ्या रंगाच्या बंद बाॅडीच्या जिपकडे पळाला आम्ही तिच्या मागे पळत गेलोत पण तो गाडीत बसुन पळुन गेला सदर गाडी ही चौसाळ्याच्या दिशेने निघुन गेली आम्ही परत गाडीजवळ आलो डिझेलचा वास आल्याने डिझेलची टाकी चेक केली असता टाकीचे झाकन उघडुन खाली टाकलेले होते मी मोबाईलची बॅट्री लावुन टाकीत पाहिले असता टाकीतील डिझेल चोरी गेलेले दिसले मी कळंबची बसमधील चालक व वाहकांना उठवुन सांगितले तेव्हा त्यांनी त्यांचे बसचे टाकी चेक केली असता त्यांचेही टाकीच झाकण खाली पडले होते. मोबाईच्या बॅटरीचे उजेडाने चेक केले असता त्यांचेपण डिझेल चोरीला गेलेले दिसले बीड आगाराच्या बस मधील अंदाजे ९० लिटर त्याची किंमत ८१०० रुपये किंमतीचे चोरीला गेले तर कळंब आगाराच्या बसमधील अंदाजे ८० लिटर डिझेल ७२०० रुपये असे एकूण दोन बस मधील १७० लिटर १५३००रुपये किमतीचे डिझेल चोरट्यांनी चोरले असून नांदूरघाट येथे मुक्कामी आलेल्या बीड आगाराच्या बस चालकाच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात डिझेल चोरीचा गुन्हा नोंद झाला असून या अज्ञात डिझेल चोरांचा तपास सहाय्यक फौजदार जसवंत शेप हे करीत आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!