आपला बीड जिल्हा

दिलीप बनसोडे यांना मातृशोक ; कोंडाबाई बनसोडे यांचे वृद्धपकाळाने निधन

महादेव काळे वादळवार्ता /प्रतिनिधी,केज

केज तालुक्यातील वरपगाव येथील दलित चळवळीतील धाडसी नेतृत्व आणि रिपाईचे जेष्ठ नेते आंबेडकरी चळवळीतील अग्रगन्य व्यक्तीमत्व

मा.दिलीप बनसोडे यांच्या मातोश्री कोंडाबाई भानुदास बनसोडे यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले असुन त्यांच्यावर काल वरपगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

या बाबत अधिक माहिती अशी की केज तालुक्यातील वरपगाव येथील भानुदास बनसोडे आणि त्यांच्या पत्नी कोंडाबाई बनसोडे या जोडीने अतिशय हलाखीच्या परिस्थितीतुन आणि गरीबीच्या झळा सोसत अतिशय काबाडकष्ट करत आणि आपला स्वाभिमान जपत आपली मुले शिकवली त्यांना लहानाचं मोठ केलं. त्यांना मोहन,जिवन, महादेव आणि दिलीप अशी चार मुलं त्यापैकी दिलीप यांनी उच्च शिक्षण घेतले मात्र त्यांच लहानपन हे दलित समाजातील प्रश्नन सोडवण्यासाठी गेल्याने तेच संस्कार त्यांचेवर झाले. आणि पुढेही त्यांनी आपले आयुष्य समाजासाठीच खर्ची केले आहे. गेल्या दोन ते आडीच वर्षापूर्वीच त्यांचे वडील भानुदास बनसोडे हे देखील बुध्दवाशी झाले.त्यामुळे कुटुंबातील कुटूंबप्रमुखाची जबाबदारी दिलीप बनसोडे यांच्या आई कोंडाबाई बनसोडे यांनी संभाळत कुटुंब संभाळले. मात्र निसर्ग नियमानुसार ज्याला जन्म आहे. त्याला मरण हे निश्चित आहे. अशाच निसर्ग नियमानुसार दलित चळवळीतील धाडसी नेतृत्व दिलीप बनसोडे यांच्या मातोश्री यांनी अखेर दि.५ सप्टेबंर सोमवार रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पार्थिवावर दि. ६ सप्टेबर मंगळवार या दिवशी सकाळी १०:०० वा. केज तालुक्यातील त्यांच्या वरपगाव या गावी बौध्द पध्दतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. त्यांची रक्षा सावरण्याचा कार्यक्रम दि.७ बुधवार रोजी सकाळी ८:०० वा.करण्यात आला असुन जलदानविधीचा कार्यक्रम याच दिवशी दुपारी ठेवण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात चार मुलं , सुना नातवंडे असा मोठा परिवार असुन त्यांच्या जाण्याने गावात व आप्तेष्ठ यांच्यातुन हळहळ व्यक्त होत आहे. दिलीप बनसोडे यांच्या वरील आई वडीलांचे छत्र हरवल्याने ते व त्यांचे कुटुंब पोरके झाले आहे. रक्षा सावरताना अनेकांनी बनसोडे परिवाराला या दु:खातुन सावरण्याची बुध्दाकडे प्राथना केली आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!