Uncategorized
राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये मुख्याधिकाऱ्याचाच ढिसाळ कारभार ; गुत्तेदारांना पोसण्यात मग्न ?

वादळवार्ता – केज
केज शहरामधुन जाणारा राष्ट्रीय महामार्ग त्या महामार्गाचे तब्बल तीन वर्षापासुन काम एच.पी.एम कपंनीचे सुरू आहे. या रस्त्याचे कामकाज तथा क्वालीटी कंट्रोल करण्यासाठी महाराष्ट्र राज्यमार्ग विकास महामंडळ यांच्याकडुन मुख्याधिकारी म्हणुन रवि कुमार यांची नियुक्ती केली . मात्र मुख्याधिकारी रवि कुमार यांच्या ढिसाळ कारभारामुळे राष्ट्रीय महार्गास मस्साजोग , केज, लोखंडी सावरगाव , आमदार निवास , अंबाजोगाई बायपास , धायगुडा पिपंळा व त्याच्या पुढे जागोजागी रस्ता खचत आहे तर मोठ – मोठ्या भेगा पडत आहेत .
विशेष म्हणजे या सर्व रस्त्याचे गुणवत्ता (क्वालीटी कंट्रोल ) तपासुन बिले काढण्याची जिम्मेदारी हि रवि कुमार यांच्याकडे होती. जर रस्त्याची गुणवत्ता चांगली असती तर सिमेंटचे रस्ते खचले किवां त्यास भेगा ,तडे गेले नसते. परंतु रवि कुमार यांच्या ढिसाळ कारभारामुळे गुत्तेदारांची करोडो रुपयांची बिलेही निघत आहेत व रस्त्याही खचत आहे. त्याबरोबरच संध्याच्या स्थितीत राष्ट्रीय माहामार्गाच्या रस्त्यालगत येणाऱ्या गावांनकडे जाणाऱ्या रस्त्याचे कामे युद्धपातळीवर सुरु असुन त्यामध्येही मोठ्या प्रमाणात कामे आबड – धोबड तथा निकृष्ट दर्जाची होत असुन या वरती देखील मुख्याधिकारी रवि कुमार यांचे कसल्याही प्रकारचे लक्ष नसल्यामुळे शासनाचा हजारो कोटीच्यां विकास कामांसाठी दिलेला विकास निधी गुत्तेदारांच्या खिशात जात असताना दिसत आहे. जंपीकचे , तडे, भेगा पडलेले रस्ते असतानाही मात्र पाटोदा येथील टोल नाका चालू केला आहे .रस्त्याची गुणवत्ता नसतानाही टोल सुरु करने म्हणजे शंकाच निर्माण होते.
सदरील रस्त्याच्या निकृष्ट कामांमुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात आपघात होत आहेत. परंतु मुख्याधिकारी रवि कुमार यांचे रस्त्याच्या कामावरती लक्ष न देता गुत्तेदारांना पोसण्यात मग्न आहेत का ? राष्ट्रीय महामार्गावरती मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत याची जिम्मेदारी रवी कुमार घेतील का ? आदि प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडले आहेत.
यासाठी लवकरच एक शिष्ट मंडळ महाराष्ट्र राज्यमार्ग विकास महामंडळ मुंबई व औरंगाबादच्या येथील वरिष्ठ अधिकार्यांना भेटण्यासाठी जाणार असल्याचे समजते आहे.



