केज तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त गुंणाना वाव देण्यासाठी संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.
वादळ वार्ता – केज
या बाबत सविस्तर वृत्त असे कि केज तालुका संघर्ष पत्रकार संघ केज च्या वतीने तालुका स्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन 29 जानेवारी 2023 रोजी येथील पंचायत समितीच्या प्रांगणात सायंकाळी 5 ते रात्री 10 यावेळेत करण्यात आले असून या स्पर्धेत तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांनी सहभाग नोंदवला आहे. सदरील कार्यक्रमास राजकीय नेते शासकीय अधिकारी कर्मचारी यांची उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष ह. भ. प. केशव महाराज शास्त्री तर प्रमुख पाहुणे म्हणून येडेश्वरी कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे , भाजपाचे नेते रमेश आडसकर तथा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तथा पत्रकारीता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून केज संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने या वर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तसेच या स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या गीतासाठी पारितोषिक स्मृतिचिन्ह ७७७७ तर व्दितीय गीतासाठी पारितोषिक स्मृतिचिन्ह ५५५५ तर तृतीय पारितोषिक ३३३३ असे देण्यात येणार आहे. विजेत्या व उपविजेत्या शाळांना आकर्षक बक्षीषे, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे .
या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी प्रेषकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संघर्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल गलांडे व सर्व सदस्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!