
रविवारी केज येथे जनजागरण सभा
वादळवार्ता – केज
दारु हा शारीरिक व मानसिक आजार आहे आणी यापासून मुक्तता मिळण्यासाठी अल्कोहोलिक ॲनॉनिमस सेवा समिती राज्यात काम करत आहे व दारू ही मोठी समस्या सुटण्यासाठी आवश्यकता आहे ती साधी १२ स्टेप ची यासाठी रविवार दि २९ रोजी जनजागरण सभा आहे ज्या मधे स्वअनुभवाने दारुचा आजार सोडवणारे आपला अनुभव सांगून दारु पासून मुक्त करणार कोणतीही फीस नाही की कोणतेही औषध देणार नाही देणार फक्त अनुभव .
अल्कोहोलीक ॲनॉनिमस सेवा समिती ( महाराष्ट्र राज्य ) या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून राज्यातील अनेक मद्यशक्तीपुढे हतबल झालेल्या आणी जिवन अस्ताव्यस्त झालेल्या ज्यांची दारु या आजारपणातून मुक्त होण्याची इच्छा असणाऱ्या साठी काम करणारी ही संस्था आहे व या संस्थेच्या माध्यमातून अनेक जन या आजारा पासून दुर झालेले आहेत .
या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक चार महिन्याला चौमाही परिषद वेगवेगळ्या ठिकाणी होत असते यावेळी ही परिषद केज ला होत असून यामधे संस्थेच्या माध्यमातून काय काम केले व पुढील चार महिन्यात काय काम करायचे हे ठरवले जाते . या उपक्रमाला कोणताही निधी लागत नाही जो काही खर्च करायचा तो स्वतः स्वतःसाठी करायचा औषध नाही फक्त ज्यांना हा आजार होता ते आपला अनुभव सांगणार व त्यातून आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी काय करायचं हे ते सांगणार प्रत्येकाला सन्मानपुर्वक वागणूक देऊन हे केले जाणार आहे .
रविवार दि २९ जानेवारी रोजी जयभवानी कन्या शाळा कानडी रोड केज येथे याअल्कहोलीक ॲनॉनिमस सेवा समितीच्या वतीने जनजागरण सभा सकाळी १० वा आयोजित केली असून या जनजागरण सभेला मद्यशक्ती पुढे हतबल झालेल्यानी यावे व आपल्या जिवनाला दारू पासून मुक्त करून चांगले जिवन जगावे असे अवाहन अल्काहोलीक ॲनॉनिमस सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे .
संपर्क साधा -9975210341