आपले केजशिक्षण

१० दिवसां नंतर गटशिक्षण अधिका-यांनी उघडले शाळेचे कुलुप 

वादळवार्ता/येवता

केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील हनुमान वस्ती येथील पहीली ते पाचवी पर्यंतच्या शाळेतील  २ शिक्षकांपैकी एका शिक्षकाची नियुक्ती तहसिलदारांनी निवडणुक कामासाठी केल्या मुळे या शिक्षकाची नियूक्ती रद्द करण्याच्या मागणीसाठी पालकांनी दहा दिवसापुर्वी शाळेला लावलेले कुलुप गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांच्या मध्यस्थिने सोमवारी  सकाळी उघडण्यात आले.व शाळा खोलीत वर्ग भरविण्यात आले.

या शाळेवरील एका शिक्षकाची निवडणुक कामासाठी करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्याच्या मागणीसाठी  पालकांनी दि. ५ जानेवारी रोजी सकाळी शाळेला कुलूप ठोकून शाळा बंद केली होती. व   तहसीलदार, गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे शिक्षकाची नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली होती.दरम्यान दहा दिवस याची कोणीही दखल न घेतल्यामुळे हे भीजत घोंगडे तसेच होते.

दरम्यान गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी पालकांना विनंती करुन शाळेचे कुलुप उघडण्याची विनंती केली आसता,पालकांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन सोमवारी सकाळी १० वाजता शाळेला ठोकलेले कुलुप उघडले.त्यामुळे दहा दिवसानंतर ही शाळा वर्ग खोलीत भरली.

आठ दिवसानंतर पुन्हा कुलुप ठोकणार..!

दरम्यान गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांच्या विनंतीला मान देवुन  हनुमान वस्ती येथील पालकांनी  शाळेचे कुलुप उघडले आसले तरी आठ दिवसात निवडणुक कामासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या शिक्षकाची नियुक्ती तहसिलदारांनी आठ दिवसात रद्द करावी नसता पुन्हा या शाळेला कुलुप ठोकण्यात येईल असा इशारा शालेय व्यवस्थापन समीतीच्या अध्यक्षा शोभाताई चौरे व बळीराम चौरे या पालकांनी यावेळी दिला आहे..

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!