सोयाबीनला पीक विमा लागू करा मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्ता रोको आंदोलन करणार
वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज तालुक्यातील सोयाबीन पिकाला पिक विमा करा या वाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. २७ सप्टेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल रांजणकर आणि अशोक गित्ते, भागवत पवार, सय्यद जमील पटेल, खालेक फारोकी, युवराज मगर, उमेश गवळी, मंदार रांजनकर आणि संदेश लोंढे यांच्या शिष्टमंडळाने केज तहसीलदारांना पीक विम्या संदर्भात निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, केज तालुक्यातील सोयाबीनच्या पिकावर शंखी गोगलगाय, यलो मोझॅक, चक्री भुंगा याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे. तसेच तब्बल एक महिना पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे सोयाबीनचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाला पीक विमा लागू करण्यात यावा.
या मागणीसाठी दि. ४ ऑक्टोबर रोजी केज येथील छत्रपती शिवाजी चौकात ठीक ११:०० वा. रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष अनिल रांजणकर आणि अशोक गित्ते, भागवत पवार, सय्यद जमील पटेल, खालेक फारोकी, युवराज मगर, उमेश गवळी, मंदार रांजणकर आणि संदेश लोंढे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.