वादळवार्ता प्रतिनिधी – शाहेद खतीब
प्रत्येकाला आपला परिवार प्रिय असतो , प्रत्येकजण आपले कुटुंब सुःखामध्ये रहावे त्यांच्या गरजा पुर्ण व्हाव्या याकरिता झटत असतो . मात्र कांहिजनाना आपल्या रुढी परंपरेनुसार काम करावे लागतात त्यापैकी एक प्रकाश रमेश घनसारवडे मागील आठ वर्षापासुन केज नगरपंचायतच्या अंतर्गत येणार्या सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत .
त्यांना दोन छोट्या मुली संजना , श्रावणी व मुलगा कार्तिक आहे . संजना , श्रावणी जिल्हापरिषद शाळा क्रांतीनगर याठिकाणी प्राथमिक शिक्षण घेत आहेत . कोविड १९ च्या काळामध्ये ज्या वेळेस परिवारातील लोक दुरवरुणच अंतिम संस्कार करायचे त्यावेळेस मात्र घनसारवडे स्वतः त्या मृतदेहाचा अंतिम संस्कार करत असत .
केज शहरातील असंख्य मृतदेहाचे अंतिम संस्कार घनसारवडे यांच्या हाताने झाले आहेत . कोविड काळामध्ये मृतदेहाचे अतिम संस्कार करण्यासाठी मोठा निधी यायचा परंतु केज नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने त्यांना ५०० रुपये ऐवढे तुटपुंजे मानधन दिले जायचे ,त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होत असे. आज आठ वर्षापासुन ते अविरतपणे सार्वजनिक स्मशानभूमी मध्ये अंतिम संस्कार करतात .
लाकडे आणने , सरण रचने, मृतदेह जाळणे , रक्षा गोळा करणे , स्मशानभूमी मध्ये स्वच्छता ठेवणे असे विविध कामे ते करतात मात्र त्यांच्या या कार्याची आजपर्यंत केज नगरपंचायतच्या प्रशासनकडुन वा नेत्याकडून दखल घेतली गेलीली नाही . ते आद्यापपर्यंत मानधनापासुन वंचित आहेत . वेळीच त्यांच्या मानधनाचा विचार केला गेला नाही तर खऱ्या सामाजीक कार्यकर्त्यावर, कोरोना योद्ध्यावर मृतदेह स्मशानात येण्याचीच वाट पाहवी लागेल .
__________________________________
नगरपंचायतचा नगरसेवक या नात्याने आपल्या बातमीचे, विचारांचे समर्थन करतो आणी स्मशानभूमीमध्ये वास्तव्यास असणारे घनसारवडे यांच्या कुटुंबाला केज नगरपंचायत मार्फत मदत मिळावी यासाठी प्रमाणीक प्रयत्न करेल.
अजहर इनामदार
नगसेवक न.प. केज
__________________________________
केज नगपंचायत च्या प्रशासनास माझी विनंती राहिल कि आपण लवकरात लवकर घनसारवडे या खऱ्या कोविड योद्ध्यास प्रत्येक महिन्यास मानधन सुरु करावे .
कपिल मस्के
मा. नगसेवक न.प. केज
__________________________________
माझी केज नगरपंचायत प्रशासनस नम्र विनंती आहे की आपण केज येथील क्रांतीनगर समशान भूमीत वास्तव्यास असलेल्या घनसारवाडे कुटुंबास दर महिन्याला मानधन दयावे.
लांडगे एस. एस.
केज,नागरीक.