आपला बीड जिल्हाक्राईम

पोलिंसाच्या गस्तीपथकाने पकडले चार मोटार चोर : तिघे चोर निघाले महाविद्यालयीन विद्यार्थी !

वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे

रात्रीच्या वेळी गस्त घालित असलेल्या पोलीस पथकाने विहिरीतील मोटारींची चोरी करणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करून चार चोरट्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. या चार पैकी तिघे महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे आढळून आले आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. २३ जुलै ते २४ जुलै दरम्यान रात्रीच्या वेळी केज पोलीसांचे गस्ती पथकातील पोलीस जमादार अशोक थोरात आणि पोलीस नाईक बाळराजे सोनवणे, बजरंग इंगोले हे केज पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालीत होते. दि. २४ जुलै रविवारच्या मध्यरात्री १:३० वा च्या दरम्यान पोलीस पथकाला शिंदी ता. केज येथे त्यांना एक संशयित वाहन दृष्टीस पडले. त्याला थांबण्याचा इशारा करूनही ते थांबले नाही म्हणून पोलिस पथकाने त्यांचा सरकारी वाहनाने पाठलाग करून त्यांना अडविले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी वाहनात खते व बी-बियाणे असल्याचे सांगितले. मात्र पोलीस पथकाने पाहणी केली असता त्यांचेकडे वाहनात तीन पाणबुडी पंप आणि वायर कटर, पाइप कापण्यासाठी हॅकसॉ ब्लेड, स्क्रू ड्रायव्हर, टेस्टर, पक्कड असे साहित्य आढळून आले. त्यामुळे पोलिस पथकाने त्यांना त्यांच्या वाहन आणि साहित्यासह केज पोलीस ठाण्यात आणले. केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे आणि पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी अधिक चौकशी केली असता ते चौघे चोरटे हे धारूर तालुक्यातील मैंदवाडी येथील असल्याचे निष्पन्न झाले. या चोरट्यांनी पाण्याच्या मोटारी या धारूर तालुक्यातील मैंदवाडी परिसरातून चोरून आणल्या होत्या हे स्पष्ट झाले. हे चौघे सिद्धेश्वर मोहन मैंद, वय (१९ वर्ष), ऋषिकेश रावसाहेब मैंद, वय(२१ वर्ष), महेश सखाराम केदार, वय (१९ वर्ष) आणि बालाजी रामेश्वर मैंद वय (१९ वर्ष), सर्व रा. मैंदवाडी ता. धारूर येथील आहेत.

सदरची घटना ही धारूर तालुक्यातील असल्याने केज पोलिसांनी त्या चौघांना धारूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे यांच्या ताब्यात दिले.

शेतकऱ्यांच्या विहिरी व बोअरच्या मोटारी, स्टार्टर, पाईक, स्प्रिकंलर असे साहित्य चोरणाऱ्या चोरांची टोळी पकडणाऱ्या केज पोलिसांच्या गस्ती पथकातील पोलीस जमादार अशोक थोरात, पोलीस नाईक बाळराजे सोनवणे, बजरंग इंगोले यांनी मोठ्या धाडसाने चौघांना पाठलाग करून पकडले. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या चौघा चोरट्याकडून अनेक चोरीच्या घटनेतील माहिती मिळू शकते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!