आपले केजक्राईम

केज तहसील व पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिचून अतिक्रमण

तहसील समोरच उभारले अनधिकृत बांधकाम; आंदोलकांसाठी राखीव जागाही गिळंकृत

केज । प्रतिनिधी

केज शहरातील प्रशासकीय दारातच अतिक्रमणाचे बिनधास्त साम्राज्य उभे ठाकल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तहसील कार्यालयासमोर, आणि अगदी केज पोलिस ठाणे व तहसील कार्यालय यांच्या मधोमधच पत्र्याचे शेड उभे करून अतिक्रमण सुरू असल्याची जोरदार चर्चा शहरात आहे. विशेष म्हणजे, हे सर्व कथितरीत्या रात्रीच्या अंधारात पत्र्याचे डबे ठोकून सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.सर्वसामान्य नागरिकांना आंदोलन करण्यासाठी राखून ठेवलेली जागासुद्धा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे. आंदोलकांसाठी असलेली ही जागा व्यापली गेल्याने लोकशाही मार्गाने आपला आवाज उठविण्याची जागाच हिरावली गेल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

“तहसीलसमोर आणि पोलिस ठाण्याच्या कुशीतच सुरू असलेले हे अतिक्रमण प्रशासनाच्या दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. प्रशासकीय यंत्रणा डोळ्यासमोर घडणाऱ्या या प्रकाराकडे डोळेझाक का करतेय, असा सवालही नागरिक विचारत आहेत. दरम्यान, संबंधित अतिक्रमणाविरोधात तत्काळ कारवाई करून सार्वजनिक जागा मोकळी करून द्यावी, जबाबदारांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!