
केज । प्रतिनिधी
केज शहरातील विविध महापुरुषांच्या चौकांना नगरपंचायतने अधिकृत मान्यता दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज,महात्मा फुले,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ,संत भगवान बाबा,संविधान चौक आदी महापुरुषांच्या चौकांची नावे आता अधिकृत रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.मात्र या निर्णयावरून एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे कि तथागत गौतम बुद्ध यांच्या चौकास अद्याप अधिकृत मान्यता मिळाली नाही. स्थानिक नागरिक आणि बौद्ध समाजाच्या प्रतिनिधींनी या मुद्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
“शहरातील सर्व महापुरुषांचे चौक मान्य करून बुद्ध चौक दुर्लक्षित करणे, हे पक्षपातीपणाचे लक्षण आहे,” असे प्रतिपादन काही समाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे. त्यांनी नगरपंचायती कडे लवकरात लवकर गौतम बुद्ध चौकास मान्यता देण्याची मागणी केली आहे. सदरील चौकास मान्यता दिली नाही तर अंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे केज नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर अलका सरवदे,बचुटे प्रियंका राजु , भालेराव तृप्ती अमोल,कौशल्य सिद्धार्थ हजारे ,करूणा हजारे,राजकन्या बचुटे,आशा राजू बचुटे,बचुटे राजु सदाशिव,अर्जुन सदाशिव बचुटे, अमोल अर्जुन बचुटे,ज्याती अंकुश शिंदे,विष्णु लक्ष्मणराव वैरागे,सीताराम निवृत्ती कसबे,बाळासाहेब हनुमंत साखरे, समीर इनामदार,विष्णुपंत रांजणकर, नामदेव रांजणकर ,जयराज बचुटे,मुक्ताबाई बचुटे,थोरात नरहरी राजाराम ,रामा किसन आचार्य , अनिता कांबळे,अविनाश बनसोडे, श्रीमंत राऊत, थोरात सुनील,सतीश बनसोडे यांच्या सह्या आहेत .
केज कळंब रस्त्यावरील रस्त्यावरील बौद्ध बांधवांनी जी मागणी केली आहे ती रास्त असून सत्ताधार्यांनी तथा प्रशासनाने तात्काळ मान्यता द्यावी नव्हे तर त्यासाठी प्रशासनाकडे मी प्रयत्न करणार .
सौ. शितलताई दांगड
उपनगराध्यक्ष न.प. केज
केज कळंब रस्त्यावरील तथागत गौतम बुद्ध यांच्या चौकास आमचा पाठींबा असुन त्यासाठी मी सर्वतपरी प्रयत्न करणार.
भाऊसाहेब गुंड
गटनेते , केज नगरपंचायत
बौद्ध बंधुनी केलेल्या न्यायीक मागणीला पूर्णपणे पाठिंबा असुन त्यांच्या मागणीसाठी प्रयत्नशील राहणार
शकुंतला सज्जनराव अंधारे
नगरसेविका, केज नगरपंचायत