आपला बीड जिल्हाक्राईम

परळी येथील जुगार अड्ड्यावर पंकज कुमावत यांची धाड

६ जुगारी ताब्यात तर ९ फरार

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

अवैद्य धंदेवाल्यांचे कर्दनकाळ सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे प्रशिक्षण संपवून परत येताच त्यांनी अवैद्य धंद्याचे कंबरडे मोडण्यासाठी कारवायांचा सपाटा लावला आहे.

परळी येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकून रोख रकमेसह दीड लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेत ६ जुगाऱ्याना अटक केली तर ९ जुगारी पळून गेले.

परळी येथे हमलवाडी मध्ये साईनाथ उर्फ बंटी माने हा झन्ना-मन्ना नावाचा पत्त्यांचा जुगाराचा क्लब चालवीत असल्याची माहिती एका गुप्त खबऱ्याद्वारे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. माहिती मिळताच पंकज कुमावत यांनी स्वतः दि.११ जानेवारी रोजी त्यांचे विशेष पथकातील पोलिस अंमलदार बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, विकास चोपणे, अनिल मंदे, सचिन अहंकारे ,संजय टूले यांना सोबत घेत

जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आणि अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांचे मार्गदर्शनाखाली धाड टाकली. त्या वेळी १५ इसम हे जुगार खेळत असताना आढळून आले. त्यातील ६ जुगाऱ्याना पोलिसांनी ताब्यात घेतले तर ९ जुगारी हे पळून गेले.

या धाडीत पंकज कुमावत यांनी १ लाख ५२ हजार ९४० रु. चा मुद्देमाल हस्तगत केला.

पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब बांगर यांचे फिर्यादी वरून परळी शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा १२ (अ) च्या कलम ४ व ५ प्रमाणे १५ जुगाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!