आपला बीड जिल्हाक्राईम

आज्ञात चारचाकी वाहनाने पाई चालणाऱ्या तरुणानाला चिरडले ; तरुणाचा जागीच मृत्यु

वादळवार्ता वार्तांकन – शेख शाकेर ( नेकनुर )

नेकनूर – मांजरसुंबा रोडवरील गवारी फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत २५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी रात्री ७ वा. सुमारास घडली. गाडीचे चाक डोक्यावरूच गेल्याने ओळख पटणे अवघड झाले होते. रक्तात भरून गाडीचे चाक रस्त्यावर उमटल्याने चारचाकी कार असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केले जात आहे. घटनास्थळापासून जवळच होंडाई कारचा साईड ग्लास तुटलेला भाग मिळाल्याने ते वाहन कारच असल्याचे अंदाज नेकनूर पोलिसांनी व्यक्त केला आहे.

घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदन साठी नेकनूर कुठीर रुग्णालयात पाठवला आहे .

दरम्यान या रोडवर अपघाताचे प्रमाण वाढते असून आठवड्यातील हा दुसरा अपघात आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!