वादळवार्ता – स्नेहसंमेलन वार्ता
येवता : केज तालुक्यातील येवता येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यासाठी आले.
पथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला येवता गावातील प्रतिष्ठित नागरिक व शाळेचे सर्व शिक्षक वृंद व मान्यवर यांच्या उपस्थितीत दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .
यावेळी स्नेहसंमेलनात प्रथम हर हर शंभू या गिताने सुरुवात करण्यात आली. तसेच स्नेहसंमेलनात भरपूर अशी सांस्कृतिक गाणे लावणी ,भावगीत अशा वेगवेगळ्या गाण्यावर छोट्या मुलांनी आपले कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न केला यांची तयारी करून घेण्यासाठी शाळेच्या महिला शिक्षिका श्रीमती गुजर मॅडम, श्रीमती ऊटीकर मॅडम,श्रीमती शोभा चौरे,श्रीमती सोळंके मॅडम ,जोगदंड सर यांनी परिश्रम घेऊन या विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली तसेच थोरवे सर घुबडे सर जोगदंड सर या सर्व कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक गित्ते सर यांनी सहकार्य करून कार्यक्रम व्यवस्थित पार पडला . यावेळी महिला शिक्षिका यांनी केलेल्या परिश्रमाचे गावच्या वतीने विशेष आभार मानले तसेच गुजर मॅडम यांनी केलेल्या परिश्रमा बद्दल पुनश्च त्यांचे आभार मानले व सर्व शिक्षकांना प्रोत्साहन देऊन गावच्या वतीने आभार मानले .
या कार्यक्रमाविषयी शाळेचे शिक्षक यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता असे स्पष्ट मत थोरवे सर व प्रदीप जोगदंड सर यांनी स्पष्ट केले यावेळी गावातील मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते . नागरीकांंनी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी बक्षीस स्वरूपात 27 हजार 800. रुपये देण्यात आले यावेळी शाळेचे उप मुख्याध्यापक प्रदीप जोगदंड सर यांनी सांगितले की या बक्षीसातून आम्ही शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात शाळेचे नाव उज्वल करण्यासाठी याचा वापर करणार असल्याचे स्पष्ट केले यावेळी गावातील मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता