वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
जिल्हा सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने सोलापूर-बीड हायवेवर धाडसी कारवाई करून गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक अडवून ३६ लाख रु. चा गुटखा पकडला.
या बाबत विश्वसनीय सूत्रा कडून मिळालेली माहिती अशी की,
दि. ३ फेब्रुवारी रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदार माहिती मिळाली, दि. ४ फेब्रुवारी रोजी पहाटे ट्रक क्र.(जी जे-१२/ ए वाय-९४२५) या मध्ये गोवा गुटख्याचा माल बसवकल्याण येथे भरून तो सोलापूर ते बीड रोडने मांजरसुंबा मार्गे बीड येथे जात आहे.
अशी माहिती मिळाल्या नंतर पंकज कुमावत यांनी ही महिती त्यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्या नुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, राजू वंजारे, विकास चोपणे, संजय टुले, दिलीप गित्ते, अनिल मंदे, सचिन अहंकारे यांनी सापळा लावला दि. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ६:०५ वाजता चौसाळा ते बीड रोडवर उदंडवडगाव येथे संशयीत ट्रक अडवून त्याची पंचा समक्ष झडती घेतली. ट्रक चालक वजीर इम्रान गुल मोहम्मद व क्लिनर समीर सुलेमान नोतियार यांना ताब्यात घेऊन ताब्यात घेऊन ट्रकची पाहणी केली असता ट्रकमध्ये गोवा गुटख्याचे ४० मोठे भोद; प्रत्येक भोंडमध्ये चार पोते असे एकूण १६० होते त्याची किमती ३६ लाख रुपये आणि ट्रक व मोबाईलसह एकूण किमती ५१ लाख २० हजार रु. मुद्देमाल ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल बालाजी दराडे यांच्या फिर्यादी वरून नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.