आपला बीड जिल्हा

बलात्कार, गर्भपात आणि अट्रॉसिटीच्या प्रकरणातील नगरसेविकेचा पती सराईत गुन्हेगार सुग्रीव कराड याला न्यायालयीन कोठडी  

बलात्कार, गर्भपात आणि अट्रॉसिटीच्या प्रकरणातील नगरसेविकेचा पती सराईत गुन्हेगार सुग्रीव कराड याला न्यायालयीन कोठडी

 वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

मागासवर्गीय परित्यक्ता महिलेला बळजबरीने पळवून नेऊन; लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार करून तिचा गर्भपात केल्या प्रकरणी एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यां विरोधात बलात्कारा, अवैद्य गर्भपात आणि अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणातील नगरसेविकेचा पती सराईत गुन्हेगार याची तीन दिवसांची पोलिस कोठडी संपल्या नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

केज नगर पंचायतीच्या नगरसेविकेचा पती आणि पंचायत समितीच्या सदस्या यांचा मुलगा सराईत गुन्हेगार सुग्रीव कराड याच्या विरुद्ध एका अनुसूचित जातीतील परित्यक्ता महीलेने तिला पळवून नेऊन लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला. तसेच ती दोन महीन्याची गर्भवती असताना तिचा गर्भपात करण्यासाठी; बळजबरीने तिला गर्भपाताच्या गोळ्या खायला देऊन गर्भपात करण्याचा प्रयत्न केला आणि गर्भपाता नंतरही लग्नाला नकार देत; ती अनुसूचित जातीची आहे. म्हणून लग्नाला नकार दिला.

यामुळे पीडिता केज पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास गेली; म्हणून आरोपी सुग्रीव माणिक कराड, त्याची पत्नी जनविकास परिवर्तन आघाडीच्या नगसेविका आशा सुग्रीव कराड, पंचायत समिती सदस्या मुक्ता माणिक कराड, मिरा मच्छींद्र चाटे, एक अनोळखी महिला यांनी पिडीतेच्या घरी जाऊन तिचा मोबाईल हिसकावून घेऊन तिच्या जवळील नगदी पैसे घेऊन तिला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली. अशा पीडितेच्या तक्रारी वरून केज पोलिस ठाण्यात गु. र. न. २६१/२०२२ नुसार बलात्कार, अवैद्य गर्भपात आणि अट्रॉसिटीच्या गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान दि.२४ सप्टेंबर रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस उपनिरीक्षक कुलकर्णी, संजय राठोड आणि विकास चोपणे यांनी त्याला अटक केली होती. त्या नंतर न्यायालयाने त्याला २८ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी संपल्या नंतर न्यायालयाने त्याला आता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!