आपला बीड जिल्हाआपले केज

जल जीवनच्या कामामुळे रस्त्याची लागली वाट…!

जल जीवनच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची जिल्हाधिकारी आणि मुख्यकार्यकारी अधिकाऱ्याकडे तक्रार

वादळवार्ता – केज

केज तालुक्यातील साळेगांव येथील जल जीवन योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार रिपाइंचे रविंद्र जोगदंड यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

साळेगांव ता. केज येथील जल जीवन योजने अंतर्गत गावात सुरू असलेल्या पाईप लाईनच्या कामात वापरलेले पाईप हे निकृष्ट दर्जाचे असून त्यावर कंपणीचे नाव हे उठाव अक्षरात छापलेले नाही. साधी पेंटिंग करून त्या पाईपवर ‘ निलगंगा ‘ असे कंपनीचे नाव लिहीलेले आहे. गावातील सिमेंट रस्त्याच्या मधोमध खोदकाम केले असल्याने रस्ते पूर्णतः निकामी झाले असून नालीच्या सांडपाण्यामुळे रस्त्या त चिखल झालेला आहे. पाईप लाईनचे काम सुरू करण्यापूर्वी काम।करणाऱ्या ठेकेदाराने ग्रामपंचायती कडून खोदकाम करण्या संदर्भात कोणतीही माहिती दिली नाही किंवा नाहरकत प्रमाणपत्र घेतले नाही. खोदकाम करताना प्रमाणित खोली नुसार खोदकाम केलेले नसून काम सुरू असताना त्या कामावर मंजूर झालेली रक्कम व कामाचे स्वरूप यांची माहिती दर्शविणारा फलक कामाच्या ठिकाणी लावलेला नाही. अशा प्रकारची तक्रार रिपाइंचे जिल्हा संघटक रविंद्र जोगदंड यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे दिली आहे. या संदर्भात योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा रिपाईंच्या वतीने आंदोलनाच इशारा दिला आहे.

निवेदनावर रविंद्र जोगदंड यांच्यासह तालुका सरचिटणीस गौतम बचुटे यांच्या स्वाक्षरी आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!