आपला बीड जिल्हा

अनाथांच्या दिवाळीच्या फराळासाठी अनेक जणांचे हात सरसावले !

"तुमच्या घासातला एक घास गरिबांसाठी....!"

वादळवार्ता वार्तांकन – केज

पत्रकार  गौतम बचुटे यांनी,तुमच्या घासातील एक घास अनाथांसाठी या उपक्रमा अंतर्गत केज तालुक्यातील साळेगांव येथे निराधारांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला यासाठी अनेक दानशूरांनी त्यासाठी मदत केली यासाठी मदतीची हाक दिली पत्रकार गौतम बचुटे यांच्या हाकेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद

साळेगांव ता. केज येथे सुमारे दहा ते बारा वर्षां पासून निराधार, पतित्यक्ता, दिव्यांग आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबांची दिवाळी साजरी करता यावी त्यांच्या घरातील लहान मुले आणि सदस्यांच्या तोंडात गोड अन्नाचे दोन घास जावेत: यासाठी दानशूर आणि सहृदय व्यक्तींच्या मदतीने दिवाळी फराळ व किराणा सामान वाटपाचा उपक्रम राबविला जातो.

केज तालुक्यातील साळेगांव येथे पत्रकारांच्या वतीने अनाथांची दिवाळी अर्थात तुमच्या घासातील एक घास अनाथांच्यासाठी हा उपक्रम राबविला जातो त्या द्वारे गरीब, अनाथ, बेवारस, निराधार, दिव्यांग, विधवा, आत्महत्याग्रस्त कुटुंब यांच्याही घरातील लहान मुलांना दिवाळीत अन्नाचे दोन घास मिळावेत. यासाठी हा उपक्रम राबविला जातो.

दि २५ ऑक्टोबर रोजी साळेगावातील २५ ते ३० कुटुंबांना पत्रकार गौतम बचुटे, जय जोगदंड, अक्षय वरपे, गजानन इंगळे यांनी घरपोहोच फराळाचे वाटप केले. या उपक्रमाने निराधार कुटुंबाच्या चेहऱ्यावरील फुलले हसू पाहून सर्वांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत असून संयजोकानी सर्व दानशूरांचे आभार व्यक्त केले आहे.

अनेक जणांनी उचलला खारीचा वाटा

 अगदी सातासमुद्रा पलिकडून आली मदत या उपक्रमासाठी अरब अमिरातील शास्त्रज्ञ आणि गावचे सुपुत्र डॉ प्रसन्ना राऊत यांनी आपल्या दिवंगत आजी आजोबांच्या स्मरणार्थ भरीव मदत केली. तसेच भाजपचे दत्तात्रय धस, पेट्रोल पंप मालक राहुल देशमुख, चंदू चौरे, विनोद भांगे, ॲड. किशोर आरडकर, सतीश बचुटे, सतीश वरपे, गोविंद टोपे, सपोनि शंकर वाघमोडे, सपोनि दादासाहेब सिद्धे, पोनि पुरुषोत्तम चोबे, सपोनि संतोष मिसळे, मंगेश भोले, कुंडलिक सालपे, रामदास तपसे, जाधव, विजयराज आरकडे, राजू गुंजाळ, बालासाहेब ढाकणे, पुंडलिक पोपळघट, राम यादव, सोमनाथ कापरे यांच्यासह अनेकांनी मदत केली. त्यांचे कौतुक होत आहे.

फराळात बारा प्रकारचे अन्न पदार्थ

फराळाच्या किट मध्ये संयोजकांच्या वतीने दहा अन्न पदार्थ तर दत्ता धस यांचा चिवडा आणि ज्यांच्या कडून हे सर्व जिन्नस खरेदी केले त्या पारस स्वीट होमचे मालक यांनी त्यांच्या स्वतःच्या वतीने एक जिन्नस असे एकूण १२ विविध खाद्य पदार्थांचा समावेश या किट मध्ये समावेश होता.

पत्रकारांची मदत

या कामात अगदी फराळाचे किट तयार करून त्यांचे पॅकिंग करण्यासाठी पत्रकार महादेव गायकवाड, पत्रकार संतोष गालफाडे, पत्रकार अजय भांगे, पत्रकार मुबशीर खतीब यांनी खूप मदत केली.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!