केज तालुक्यातील बीएलओ केदार सरांचा अनोखा उपक्रम : मोटार सायकलवर भोंगा लावून केली गावात जनजागृती
वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज तालुक्यातील साळेगांव केंद्रातील सातेफळ प्राथमिक शाळेचे मुख्याद्यापक बाबासाहेब केदार हे निवडणूक विभागाचे सातेफळ येथे केंद्रस्तरीय मतदान नोंदणी अधिकारी म्हणजे बीएलओ म्हणून काम करीत आहेत. त्यांनी मतदान कार्ड हे आधार कार्डशी लिंक करून घेण्यासाठी गावात मोटार सायकलवर भोंगा लाऊन त्या द्वारे जनजागृती केली.
साळेगांव ता केज केंद्रातील सातेफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले मुख्याध्यापक बाबासाहेब केदार हे राष्ट्रीय मतदान नोंदणी कार्यक्रमा अंतर्गत केंद्रस्तरीय मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम करीत आहेत नुकत्याच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दिले आहेत. त्या निमित्त आदेशाची अंमलबजावणी करून गावात जनजागरण व्हावे. तसेच मतदारांनी स्वतः मतदार कार्डाशी आधार कार्ड लिंक करण्यासाठी (voter helpline app) व्होटर हेल्पलाईन ॲप डाऊन लोड करून लिंक करण्यासाठी त्यांनी गावात गलोगल्ली फिरून मोटार सायकलवर भोंगा घेऊन माईकवरून आव्हान केले आहे. ज्या मतदारांना या बाबत काही समजले नसेल; तर त्यांनी आधार कार्डची झेरॉक्स प्रत आणि त्या सोबत वापरीत असलेला मोबाईल नंबर घेऊन त्यांच्याकडे देण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान बाबासाहेब केदार यांच्या या अभिनव कार्याची चर्चा सुरू असून त्यामुळे मतदारात वर्गात जनजागृती होत आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!