वादळवार्ता वार्तांकन – अजय भांगे
कोरोनाच्या काळामध्ये तथा लॉक डाऊनमुळे भारतातील सन उत्सवावर संपुर्णपणे बंदी होती . प्रथमच दोन वर्षानंतर सन उत्सवाला सुरुवात झाली. त्यातच गणपती बाप्पा चे आगमन झाले मोठया हर्ष उल्हासाच्या वातावरणामध्ये सन उत्सवाला सुरुवात झाली .
त्यामध्ये केज तालुक्यामध्ये राजमुद्रा गणेश मंडळ सर्वात आकर्षक, आदर्श गणेश मंडळ म्हणुन नावरुपास आले आहे .
सविस्तर वृत्त असे कि केज शहरामध्ये पंचायत समीतीच्या मैदानात राजमुद्रा गणेश मंडळ यांनी भव्य दिव्य देखाव्याची निर्मिती केली आहे .
त्या बरोबरच आनंद नगरीची देखील निर्मिती केली आहे . आकर्षक मोठमोठे राहाट पाळणे , झुले , लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य, महिलांसाठी विविध साहित्याची दुकाने आदि बारीक सारीक गोष्टीचे नियोजन राजमुद्रा गणेश मंडळाने केले आहे.
या गणेश मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक दिवशी गणपती बाप्पा ची आरती हि केज शहर तथा तालुक्यातील अधिकारी , पत्रकार , शेतकरी , सामाजीक , राजकीय व्यक्तीकडुन केली जाते . त्याबरोबरच राजमुद्रा गणेश मंडळाचे पदाधिकारी वेगवेगळया जाती धर्मातील व्यक्ति आहेत .
म्हणजेच सदरील गणेश मंडळ हे एक आदर्श गणेश मंडळ म्हणुन कार्य करत असताना दिसत आहे .
केज शहर तालुक्यातील आठरापगड जातीची लोक मोठ्या संख्येने गणपती बाप्पा चे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने राजमुद्रा गणेश मंडळाला भेट देत आहेत.
राजमुद्रा गणेश मंडळाचे अध्यक्ष अमर पाटील , पप्पु इनामदार, कपिल मस्के , समीर देशपांडे , मुंकद कणसे, दिनकर राऊत , मुज्जू कुरेशी आदि पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!