महादेव काळे , वादळवार्ता प्रतिनिधी केज
बस मधून उतरत असलेल्या महिलेच्या पर्समधील पाकिटात ठेवलेले ३ लाख ५० हजार रुपये किंमतीचे दागिने अज्ञात अनोळखी महिलांनी गर्दीचा फायदा घेत लंपास केल्याची घटना केज शहरातील शिवाजी चौकात उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात दोन महिलांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की केज तालुक्यातील नाव्होली येथील वृद्ध शेतकरी महादेव विठ्ठल जगताप यांची मोठी विवाहित मुलगी चंद्रकला या महिला दि.२ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता औरंगाबाद येथून मुलीसह लक्ष्मी देण्यासाठी व भाऊ श्रीराम याच्या मुलाला पाहण्यासाठी माहेरी नाव्होली येथे औरंगाबाद – अंबाजोगाई बसने येत होत्या. त्यांनी येताना ५९ ग्रॅमचे विविध प्रकारचे दागिने हे पर्समधील पाकिटात ठेवले होते. तर महादेव जगताप हे मुलगी व नातीला घेऊन गावाकडे नाव्होली येथे घेवुन जाण्यासाठी केज शहरातील शिवाजी चौकात बसची वाट पाहत बसले होते. ही बस १२ वाजेच्या सुमारास शिवाजी चौकात येऊन थांबली असता चंद्रकला व त्यांची मुलगी पूजा या दोघी बसमधून उतरत असताना बसमध्ये त्यांचेवर पाळत ठेवून असलेल्या दोन अज्ञात महिलांनी गर्दीचा फायदा घेत त्यांच्या पर्समधील पाकिटात ठेवलेले २५ ग्रॅमचे सोन्याचे पट्टी गंठण, १० मिनी सोन्याचे गंठण, ८ ग्रॅमच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, ग्रॅमचे सोन्याचे झुमके फुले, ४ ग्रॅमचे सोन्याचे मणीमंगळसुत्र, ५ ग्रॅमचे पत्ता मणी, १ ग्रॅमचे कानातील कुंडल, अर्धा ग्रॅमची सोन्याची नथ असे एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचे दागिने पाळत ठेवुन व दागिणे घेवुन पोबारा केला. महादेव जगताप यांच्या फिर्यादीवरून अनोळखी दोन महिलांविरुद्ध केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली केज पोलीस पुढील तपास करत आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!