आपला बीड जिल्हाशेतकरी
शेतकरी राजा चिखलात बसुन वाट पाहतोय केजकरांची ;जगाच्या पोशींद्याची गैरसोय आणी हाल

केज येथील आठवडी बाजाराकरिता केज न.प.ने केलेला विकास ; मिळेल का न्याय शेतकरी राजाला
वादळवार्ता वार्तांकन – मुबशीर खतीब
शेतकरी राजा आपल्या शेतामध्ये राब राब राबतो, रक्ताचं पाणी करतो पिकांना जीवापाड जपतो , अनेक संकटावर मात करतो. आणी त्या पिकांचा मोबदला मिळविण्यासाठी शहराचा बाजार गाठतो. शहरात येत असताना त्या शेतकरी राजाला उद्याचे म्हणजेच शहरी बाजारात जाण्याकरीताचे नियोजन एक दिवस अगोदरच करावे लागते . बळीराजा उन,वारा,पाऊस कशाचीच तमा न बाळगता शहर गाठतो ज्या ठिकाणी बाजार भरतो त्या ठिकाणी जागा धरतो तो त्या जागेचा शासकीय कर देखील भरतो.
असाच एक आठवडी बाजार केज शहरामध्ये पंचायंत समीतीच्या मैदानात तथा गटसाधन केंद्रांच्या समोर भरविला जातो . केज शहराची लोकसंख्या तीस हजार जवळ असलेमुळे केज तालुक्यातुन या बाजारास मोठ्या प्रमाणात शेतकरी येतात . केज नगरपंचायत ने घालून दिलेल्या नियमानुसार कर देखील भरतात . मात्र त्या ठिकाणी शेतकर्यानसाठीची कोणतीही सुःख सुविधा पुरविली जात नाही . साधे फिरते सौचालय देखील उभे केले जात नाही . शेतकर्याला दिवसभर बसण्याची सुद्धा व्यवस्था केली जात नाही ना पाण्याची ना निवार्याची.
शेतकरी कित्येक दिवसापासुन या सर्व गोष्टी पासून सुविधे पासुन वंचित आहे. शेतकरी पाऊसात , चिखलात बसुन केज शहरातील नागरीकांची वाट पाहत आहेत.
केज शहरातील नागरीक सुद्धा शेतकरी, कष्टकरी लोकांचे हाल बघुन हळहळ व्यक्त करत आहेत .
मात्र केज नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने शेतकर्याची साधी दखल सुद्धा घतली जात नाही .ना केज शहरातील नेते यावरती आवाज उठवत आहेत.
येईल का कोणी पुढे बळीराजासाठी आवाज उठवालायला ?



